agriculture news in marathi, Vidarbha, Rain prediction in North Maharashtra | Agrowon

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

पुणे  : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य भारतातील राज्यात पावसाने जोर धरला आहे. राज्याच्या पूर्व आणि उत्तर भागांतही ढगांची दाटी झाली आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २६) विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर पुणे आणि पालघर जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुणे  : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य भारतातील राज्यात पावसाने जोर धरला आहे. राज्याच्या पूर्व आणि उत्तर भागांतही ढगांची दाटी झाली आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २६) विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर पुणे आणि पालघर जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र रविवारी छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशाकडे सरकले होते. तर मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकून, राजस्थानच्या गंगानगरपासून, कमी दाब क्षेत्राचे केंद्रातून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रीय होता. यामुळे मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. आज (ता. २५) उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, विर्दभातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत तसेच उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. रविवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील गोंदिया येथे प्रत्येकी ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर ढगांच्या आच्छादनामुळे तापमानातही चढ उतार सुरू असून, बीड येथे सर्वाधिक ३३.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमान २७ ते ३२ अंशांच्या दरम्यान आहे. 

रविवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :

  • कोकण : कल्याण ३०, डहाणू, पोलादपूर, उल्हासनगर, आंबरनाथ प्रत्येकी २०, भिरा, वाडा, भिंवडी, उरण, अलिबाग, माथेरान, रत्नागिरी, कणकवली, सांताक्रुझ, दोडमार्गरू पेण, वैभवाडी, संगमेश्वर, खेड, मुरबाड, मंडणगड प्रत्येकी १०. 
  • मध्य महाराष्ट्र : ओझरखेडा ३०, गगणबावडा २०, महाबळेश्वर, हर्सुल, इगतपुरी प्रत्येकी १०. 
  • मराठवाडा : लोहारा ४०, उस्मानाबाद २०. उदगीर १०. 
  • विदर्भ : गोंदिया ६०, खारंघा ५०, चिखलदरा, वरूड प्रत्येकी ४०, नरखेडा, पारशिवणी, हिंगणा, सेलू, काटोल, सिरोंचा प्रत्येकी ३०, एटापल्ली, अहेरी, सालकेसा, आष्टी, गोरेगाव, गडचिरोली, चांदूरबाजार, आमगाव, देवरी प्रत्येकी २०, रामटेक, कळमेश्वर, कुरखेडा, मोर्शी, भामरागड, ब्रह्मपुरी, धारणी, वर्धा प्रत्येकी १०.
  • घाटमाथा : कोयना नवजा ५०, शिरगाव, आंबोणे ४०. लोणावळा, ताम्हिणी प्रत्येकी ३०

इतर अॅग्रो विशेष
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...
कृषी निर्यातीला धोरणात्मक पाठबळ हवे :...जागतिक स्तरावर कृषी निर्यातीत भरपूर संधी आहे,...
शेतकऱ्यांसाठी निवडणुका फक्त...देशात असो किंवा राज्यात ज्या वर्षात निवडणुका...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
‘मिरॅकल बीन’चा लुप्त होतोय चमत्कारदोन दिवसांपासून ढगाने व्यापलेल्या आकाशाने...
स्वस्त थाळी शेतकऱ्यांना पडू शकते महागातशिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''...
नारळ, सुपारीत फुलली दर्जेदार काळी मिरीरत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावरील...