Agriculture News in Marathi In Vidarbha, soybean sprouts | Page 2 ||| Agrowon

विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 सप्टेंबर 2021

संततधार तसेच काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. भिवापूर तालुक्यात २४ तासांत १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. भिवापूर तालुक्यात २४ तासांत १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे या भागातील सोयाबीनला अक्षरशः कोंब फुटल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत कापसाची बोंडसड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. 

नागपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली आहे. सोयाबीनला इतर पिकांच्या तुलनेत मिळणारा वाढीव दर हे त्यामागील कारण सांगितले जाते. या वर्षी सुमारे ९२ हजार हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

वातावरणदेखील पोषक मिळाल्याने या वर्षी सोयाबीनचे बंपर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र गेल्या पंधरवड्यापासून विदर्भात सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे. सोमवारी (ता. २०) मध्यरात्री तर पावसाने कहरच केला. मध्यरात्रीपासून मंगळवारपर्यंत २४ तासांत १२४ मिलिमीटर पाऊस धो-धो कोसळला. अनेक गावांमध्ये नदी-नाल्यांचे पाणी शिरले. तीन फुटांपर्यंत पाणी साचून होते. शेतशिवाराची परिस्थितीदेखील यापेक्षा वेगळी नव्हती. चिखलापार गावात पावसामुळे सोयाबीन पाण्यात राहिले परिणामी काळवंडले आहे. 

ऐन काढणीच्यावेळी हा आघात झाल्याने काही शेतकऱ्यांना काहीच उत्पादन होणार नाही अशी भीती आहे. त्यासोबतच पीक काळवंडल्याने त्याला अपेक्षित दर मिळणार नाही, अशी स्थिती आहे. अकोला, यवतमाळ जिल्ह्यात देखील कापसाचे पीक पाण्याखाली आल्याने बुरशीजन्य रोग वाढून बोंडसडचा प्रादुर्भाव झाला आहे. 

पावसात बुडाले पीक 
नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये देखील संततधार पावसामुळे सोयाबीनला फटका बसला आहे. या सर्व जिल्ह्यांत पीक काढणीस आले असताना पावसाने पुन्हा पावसाने दगा दिल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. काही भागांत पावसामुळे शेतात काढणीसाठी जाणेदेखील शक्य होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

कापसाची बोंडसड 
वर्धा जिल्ह्यात कापसाची बोंडसड झाली आहे. कापसाचे पीक सतत पावसात राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. त्यामुळे कापसाची मोठ्या प्रमाणावर बोंडसड झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. कापूस उत्पादक गेल्या वर्षीच्या हंगामात बोंडआळीमुळे जेरीस आले होते. बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकऱ्यांना पीक काढून टाकावे लागले होते. यावर्षी काही भागात बोंडआळी सोबतच बोंडसडचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. परिणामी कापसाचे उत्पादकता प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वर्धा जिल्ह्यात सुमारे दोन लाख १२ हजार हेक्टरवर कापसाची लागवड आहे. त्यासोबतच एक लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. हे पीक काढणीच्या अवस्थेत असताना पावसाने पिच्छा पुरविला आहे. परिणामी, सोयाबीन काळवंडले असून काही भागांत सोयाबीनला कोंब फुटले आहेत. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात नुकसान अधिक आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर सर्वेक्षण आणि पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी देखील पावसामुळे झालेल्या नुकसानीची बाब गांभीर्याने घेत शुक्रवारी (ता. २४) प्रशासनाची आढावा बैठक बोलविली आहे. याच बैठकीत जिल्ह्यातील नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनाम्याचे आदेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

सर्वेक्षणानंतर कळणार नुकसानीची आकडेवारी 
अमरावती विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे १४ लाख हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड आहे. त्यासोबतच दहा लाख १६ हजार हेक्‍टरवर कापूस असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी दिली. या जिल्ह्यांमधील नुकसानीबाबत सर्वेक्षण आणि पंचनाम्या नंतरच सांगता येईल, असे ते म्हणाले. 
 


इतर अॅग्रो विशेष
दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाहीपुणे ः राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा...
प्रक्रिया उद्योगातून शेती झाली किफायतशीरमानकरवाडी (ता. जावळी, जि. सातारा) येथील संगीता...
यंदा कापूस तेजीतच राहणारपुणे : महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात...
पावसाने वाढली सोयाबीनची आवक नागपूर ः मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे...
ड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालनानागपूर : वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे...
शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची... पुणे : राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल...
मतदार नोंदणीसाठी राज्यभरात...नागपूर : राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६...
अकोल्यातील सिंचन प्रकल्पांच्या...अकोला ः जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांची देखभाल...
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...