agriculture news in marathi Vidharba Paddy repurchase dated extented till 31 may | Page 2 ||| Agrowon

विदर्भातील धान खरेदीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

नाशिक : विदर्भातील धान खरेदी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत वाढवून ही मुदत ३१ मे पर्यंत वाढवून देण्यास केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक : विदर्भातील धान खरेदी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत वाढवून ही मुदत ३१ मे पर्यंत वाढवून देण्यास केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विदर्भात यंदाच्या वर्षी धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले. त्याचप्रमाणे राज्य सरकारने धानासाठी १८०० रुपये हमीभाव आणि त्यावर ७०० रुपये बोनस दिला.  शेतकरी मोठ्या प्रमाणात धान शासनाच्या खरेदी केंद्रावर घेऊन येत होते.मात्र कोरोनामुळे त्यांची गैरसोय झाली होती. शासनाकडून सुरू असलेली धान खरेदी ३१ मार्च २०२० पर्यंत सुरू राहणार होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात धान उपलब्ध असल्याने तसेच कोरोनाचा प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ही मुदत अधिक वाढवून मिळावी यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राकडून धान खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात यावी यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या मध्यस्थीने केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे मागणी केली होती.

त्यानुसार केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मंत्री भुजबळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करत विदर्भातील धान खरेदीसाठी ३१ मार्च पर्यंत असलेली मुदत दोन महिन्यांनी वाढवून देत ती ३१ मे पर्यंत सुरू ठेवण्यास मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
सागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...
दुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...
विदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...
अडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...
लासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...
सर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...
राज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...
केळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
गरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी...मुंबई : सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा...
शेतमाल वाहतुकीसाठी मिळणार तत्काळ परवाना पुणे ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये...
कृषी, कृषिपूरक उद्योगांची वाहतूक सुरू...नाशिक : कृषी संबंधित बियाणे, खते, पीक कापणी आदी...
पुणे, मुंबई, नाशिक बाजार समित्या सुरू ...पुणे/मुंबई/नाशिक: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
वादळी पाऊस, गारपिटीने राज्यात पिकांचे...पुणे : राज्याच्या विविध भागात गुरूवारी (ता....
‘गोकुळ’चे दूध संकलन पूर्वपदावर कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे रविवार (ता...
पाहिजे तो भाजीपाला थेट दारात;...नाशिक : कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात...
कोणत्याही संकटाचा पहिला घाव शेतीवरच का...मा. श्री. उध्दवजी ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र...