agriculture news in marathi Vidharbha faces more than fourty degree temperature in region | Agrowon

विदर्भात पारा ४० अंशांवर

ॲग्रोवन वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

विदर्भाच्या अनेक भागांत उन्हाच्या झळा कमी अधिक आहे. यामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. येत्या रविवार (ता.४)पासून विदर्भाच्या काही भागांत पुन्हा उष्णतेची लाट येणार आहे.

पुणे : विदर्भाच्या अनेक भागांत उन्हाच्या झळा कमी अधिक आहे. यामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. येत्या रविवार (ता.४)पासून विदर्भाच्या काही भागांत पुन्हा उष्णतेची लाट येणार आहे. गुरुवारी (ता. १) सकाळी चोवीस तासांत चंद्रपूर येथे उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

गेल्या दोन ते तीन दिवस विदर्भातील अकोला, बुलडाणा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांत काही प्रमाणात उष्णतेची लाट आली होती. यामुळे या भागात कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढून तो जवळपास ४४ अंश सेल्सिअसपर्यंत गेला होता. यामुळे अनेक भागांत सकाळपासूनच उन्हाचा चटका बसत होता. दुपारी कमालीचे तापमान वाढून पारा वेगाने वाढत होता. हे तापमान जवळपास सायंकाळपर्यंत राहत असल्याने उन्हाच्या चांगल्याच चटका जाणवत होता. उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भातील जवळपास सर्वच भागांतील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर सरकले आहे.

 मराठवाड्यातही परभणी, नांदेड मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, जळगाव, मालेगाव या भागांतील तापमान चाळीस अंश सेल्सिअसवर गेले होते.  विदर्भाच्या उष्णतेचा लाटेचा परिणाम कोकण व मध्य महाराष्ट्रातही काहीसा झाला होता. आता लाट काही प्रमाणात ओसरल्याने पारा किंचित कमी झाला आहे.

कोकणात कमाल तापमाना ३२ ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमान कमी अधिक आहे. मालेगाव, सांगली, सोलापूर या ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. इतर भागांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. मराठवाड्यातही ऊन असल्याने कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आहे. विदर्भातही कमाल तापमानाचा पारा चढलेलाच आहे.  

गुरुवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः

 • शहर  ---- कमाल तापमान
 • मुंबई (सांताक्रूझ) ३२.७
 • अलिबाग        ३०.६
 • रत्नागिरी        ३४.४
 • डहाणू           ३३.३  
 • पुणे               ३८.७
 • कोल्हापूर      ३९.५  
 • महाबळेश्‍वर    ३३
 • मालेगाव        ४१.८    
 • नाशिक         ३६.७
 • सांगली          ४०.५
 • सातारा          ३८.४
 • सोलापूर        ४०.३  
 • औरंगाबाद     ३९.५
 • परभणी         ४०.५
 • अकोला    ४१.६
 • अमरावती    ४१.२
 • बुलडाणा    ३९
 • चंद्रपूर    ४३.२  
 • गोंदिया    ४०
 • नागपूर    ४१.१
 • वर्धा    ४१.१

इतर अॅग्रो विशेष
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...
शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी जमा नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
मित्राच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मदतीचा...कोल्हापूर : एकेकाळी महाविद्यालयात एकत्र धमाल...
पाच हजार कोटींचा विमा कंपन्यांना नफा पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे कवच...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
वेगवान वाऱ्याचा कोकण किनारपट्टीला फटका...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
विमा कंपन्यांना आयुक्तांचा दणका पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः देशात सध्या सोयाबीनचा मोठा तुटवडा जाणवत...