agriculture news in marathi Vidharbha faces stormy rain and hailstrom | Agrowon

विदर्भात अवकाळी पाऊस; गारपीट व वादळाचे थैमान

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 मार्च 2020

नागपूर : विदर्भात सर्वदूर गारपीट आणि अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका कापूस, रब्बी गहू, हरभरा, धान या पिकांना बसला आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. 

नागपूर : विदर्भात सर्वदूर गारपीट आणि अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका कापूस, रब्बी गहू, हरभरा, धान या पिकांना बसला आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. 

ग्रामीण भागात अवकाळी पाऊस, गारपिटीने अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आठवडाभरापासून नुकसान झाले आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत शासकीय धान खरेदी सुरू आहे. या केंद्रावर खरेदीच्या प्रतीक्षेत असलेले उघड्यावरील धान भिजल्याने त्याची प्रत खालावली. अमरावती जिल्ह्यात आंबिया बहरातील संत्रा पीक घेण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांनाही अवकाळीचा फटका बसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
शासनस्तरावरून सर्व्हेक्षण व पंचनाम्याचे आदेश होत भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गहू, खरबूज पिकाचे नुकसान...
मी सात एकर शेती करारावर करत आहे. त्याच्या व्यवस्थापनावर सव्वादोन लाख रुपयांचा खर्च झाला. तीन एकरावर गहू, तर चार एकर खरबूज होते. गव्हाची काढणी सुरू असतानाच अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे २५ पोती गव्हाचे नुकसान झाले. त्यासोबतच चार एकरांवरील काढणीच्या अवस्थेत असलेल्या खरबूज फळांना गारांचा मार बसल्याने हे पीकदेखील हातचे गेल्याची माहिती पिंपरी बोदडे (ता. नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) येथील नुकसानग्रस्त शेतकरी प्रकाश सुंदरकर यांनी सांगितले.
 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...