agriculture news in marathi, vidharbha facing heatwave | Agrowon

विदर्भात उष्णतेची तीव्र लाट; चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर होरपळले
टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 मे 2018

पुणे : विदर्भात उन्हाचा ताप वाढल्याने उष्णतेची तीव्र लाट आली आहे. चंद्रपूर येथे देशाचे हंगामातील उच्चांकी ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर ब्रह्मपुरी व नागपूर उन्हाच्या झळांनी होरपळून निघाले आहे. विदर्भातील उष्णतेची लाट गुरुवारपर्यंत (ता. २४) राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यात सध्या निरभ्र आकाश असून, गुरुवारपर्यंत कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

पुणे : विदर्भात उन्हाचा ताप वाढल्याने उष्णतेची तीव्र लाट आली आहे. चंद्रपूर येथे देशाचे हंगामातील उच्चांकी ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर ब्रह्मपुरी व नागपूर उन्हाच्या झळांनी होरपळून निघाले आहे. विदर्भातील उष्णतेची लाट गुरुवारपर्यंत (ता. २४) राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यात सध्या निरभ्र आकाश असून, गुरुवारपर्यंत कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

चंद्रपूर, ब्रह्मपुरीमध्ये यंदा सातत्याने तापमान उच्चांकी पातळीवर आहे. रविवारी (ता. २०) ब्रह्मपुरी येथे ४७.१ तर नागपूर येथे ४६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर येथे यापूर्वी १६ मे १९१२ राेजी आतापर्यंतच्या उच्चांकी ४८.३ अंश सेल्सिअस, तर ब्रह्मपुरीमध्ये २७ मे १९८३ राेजी ४७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. बुलडणा वगळता विदर्भातील सर्वच ठिकाणी तापमान ४४ अंशांच्या पुढे आहे. नागपूर, वर्धा येथेही उष्णतेची लाट आली आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेडमध्येही उन्हाचा ताप असह्य होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही उन्हाचा चटका अधिक आहे.

मॉन्सूनच्या अंदमान बेटांवरील आगमनास पोषक हवामान होत असून, बुधवारी (ता. २३) मॉन्सून अंदमानात धडकण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात आलेले ‘सागर’ चक्रीवादळाने सोमालीयाच्या किनाऱ्याला धडक दिली असून, हे वादळ लवकरच निवळून जाणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

रविवारी (ता. २०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.१, नगर ४२.८, जळगाव ४३.६, कोल्हापूर ३३.८, महाबळेश्वर ३१.७, मालेगाव ४२.६, नाशिक ३९.०, सांगली ३६.४, सातारा ३९.६, सोलापूर ४१.६, मुंबई ३४.७, अलिबाग ३८.६, रत्नागिरी ३३.२, डहाणू ३६.८, आैरंगाबाद ४१.८, परभणी ४४.५, नांदेड ४३.५, अकोला ४४.७, अमरावती ४४.६, बुलडाणा ४०.६, ब्रह्मपुरी ४७.१, चंद्रपूर ४७.८, गोंदिया ४४.२, नागपूर ४६.२, वर्धा ४५.६, यवतमाळ ४४.५.

अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत
‘सागर’ चक्रीवादळ निवळते तोच अग्नेय अरबी समुद्रात रविवारी (ता. २०) नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून मंगळवारपर्यंत (ता.२२) या भागात पुन्हा चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. हे चक्रीवादळ दक्षिण ओमान आणि उत्तर येमनच्या किनाऱ्याला धडकण्याचे संकेत आहेत. दक्षिण श्रीलंकेजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर आणखी एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. 

इतर अॅग्रो विशेष
देशात सोयाबीन लागवडीत ११ टक्के घटनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
भारताची चंद्राला पुन्हा गवसणी;...श्रीहरिकोटा : चंद्राच्या अप्रकाशित भागावर प्रकाश...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
जमीन सुपीकता जपत दर्जेदार संत्रा...दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत...
केळीत दोन हंगामात कारले पिकाचा प्रयोगजळगाव जिल्ह्यातील करंज येथील रामदास परभत पाटील...
कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी...अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात...
सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळजळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प...
राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठापुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप...
लावलेली वनवृक्षे जगवावी लागतीलनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच...
खजुराची शेती खुणावतेय विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी...
शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...