मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त
अॅग्रो विशेष
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा
पुणे : बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २०) आणखी एका कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली अाहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने आज (ता. २१) विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे. नुकतेच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशात आल्यानंतर विरून गेले आहे. त्यापाठोपाठ शुक्रवारी आणखी एक ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे.
पुणे : बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २०) आणखी एका कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली अाहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने आज (ता. २१) विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे. नुकतेच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशात आल्यानंतर विरून गेले आहे. त्यापाठोपाठ शुक्रवारी आणखी एक ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. याला लागूनच समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. रविवारपर्यंत (ता. २२) या भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) तयार होण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीमध्ये त्यामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.
पूर्व भारतातील राज्यांसह विदर्भात ढगांची दाटी झाली आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातही हलके ढग गोळा झाले अाहेत. विदर्भात आज (ता. २१) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर पश्चिम किनारपट्टीसह राज्यात पावसाचा जाेर वाढण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज अाहे. शुक्रवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मराठवाड्यात पावसाची उघडीप होती, तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला.
शुक्रवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्राेत कृषी विभाग) : कोकण : म्हसला ७०, खामगाव ७५, खेरडी ६२, असुर्डे ६५, कळकवणे ५३, शिरगांव ७५, दापोली ४२, टरवल ६८, कडवी ४०, मुरडव ५२, माखजन ६०, फुंगुस ८५, फनसावणे ७४, अंगवली ६५, कोडगाव ६७, देवली ४१, देवरुख ६५, तुलसानी ८८, माभले ५०, तेरहे ६८, सवंडल ४२, कोंडिया ५०, कुंभवडे ४७, लांजा ५५, भांबेड ६०, सातवली ५७, विलवडे ८२, पाटगाव ४०, अंबोली ५०, फोंडा ५१, सांगवे ६२, वैभववाडी ५०, येडगाव ६४, भुइबावडा ५४. मध्य महाराष्ट्र : उभेरठाणा ८८, बाऱ्हे ७१, बोरगाव ६०, मानखेड ६९, सुरगाणा ७४, पेठ ३०, मुठे ३६, भोलावडे १०३, लोणावळा ५०, हेळवाक ९१, महाबळेश्वर ९३, तापोळा ११८, लामज १६३, करंजफेन ६५, मलकापूर ४८, आंबा ७०, राधानगरी ४३, कसबा ३२, आवळी ६०, राशिवडे ८५.
- 1 of 436
- ››