विदर्भात कडाक्याची थंडी, गोंदिया ८.५ अंशांवर !

विदर्भातील काही भागांत कडाक्याची थंडी वाढली असून, शनिवारी (ता.१९) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे ८.५ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली.
विदर्भात कडाक्याची थंडी, गोंदिया ८.५ अंशांवर !
विदर्भात कडाक्याची थंडी, गोंदिया ८.५ अंशांवर !

पुणे : कोरडे हवामान आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. विदर्भातील काही भागांत कडाक्याची थंडी वाढली असून, शनिवारी (ता.१९) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे ८.५ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतातील जम्मू- काश्मीर आणि लडाख व परिसरात व उत्तर पाकिस्तान व परिसरात बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. यामुळे उत्तरेकडील पंजाब, हरियाना, चंडीगड, उत्तर प्रदेश, राजस्थान या भागांत कडाक्याच्या थंडीची लाट आली आहे. यामुळे सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. राजस्थानच्या पश्‍चिम भागातील चुरू येथे -०.१ अंश सेल्सिअसची देशातील सर्वांत कमी तापमान नोंदविले गेले. दरम्यान, राज्यातही उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा वाहू लागले आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत चांगलाच गारठा वाढला असून, किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊ लागली आहे. राज्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या अखेरीस राज्यातील अनेक भागांत थंडी वाढू लागली आहे. त्यामुळे किमान तापमानात चांगलीच घट होण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही भागांत किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, अकोला भागांत थंडी वाढली आहे. मराठवाड्यातही औरंगाबाद, परभणी भागांत थंडी काही प्रमाणात वाढली आहे. मध्य महाराष्ट्रात नगर, पुणे, सातारा, नाशिक, जळगाव या भागांत थंडी वाढली आहे. तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर भागांत बोचरी थंडी आहे. कोकणात काही प्रमाणात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे.  जलद गतीने घट... शनिवारी (ता. १९) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई (सांताक्रूझ) १९.६ (२), ठाणे २२, रत्नागिरी २२.३ (५), डहाणू २०.१ (२), पुणे १३.३ (२), जळगाव १४.५ (२), कोल्हापूर १८.४ (३), महाबळेश्‍वर १३.९ (१), मालेगाव १५.६ (३), नाशिक १४.२ (४), निफाड १६.१, सांगली १८.७ (५), सातारा १६.३ (४), सोलापूर १६.५ (१), औरंगाबाद १५ (४), बीड १८.३ (५), परभणी १३.४ (१), परभणी कृषी विद्यापीठ १२.२, नांदेड १७ (५), उस्मानाबाद १८ (५), अकोला १४.८ (२), अमरावती १५.८ (१), बुलडाणा १४ (४), चंद्रपूर १५.४ (२), गोंदिया ८.५ (-३), नागपूर ११, वर्धा १३.९ (१), यवतमाळ १४.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com