विज्ञान आश्रमात गणांनुसार नव्हे तर कलानुसार करिअर

विज्ञान आश्रमात गणांनुसार नव्हे तर कलानुसार करिअर
विज्ञान आश्रमात गणांनुसार नव्हे तर कलानुसार करिअर

शिक्रापूर, जि. पुणे ः दहावी-बारावीच्या गणांवरच करिअर ठरते हे खोटे ठरविणारा अहवाल पाबळ (ता. शिरूर) येथील विज्ञान आश्रमने नुकताच जाहीर केला. तुम्हाला आवडेल ते शिका आणि व्यवसाय (करिअर) करा या तत्त्वावर आधारीत एक वर्षाचा ग्रामीण तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम संस्थेचे संस्थापक दिवंगत डॉ. एस. एस. कलबाग यांनी सन १९८३ मध्ये विकसित केला आणि त्याच आधारे तब्बल १८०० विद्यार्थी संपूर्ण देशभरात यशस्वी उद्योजक म्हणून आपले करिअर करून दाखविल्याची आकडेवारीही संस्थेचे मुख्य संचालक डॉ. योगेश कुलकर्णी यांनी नुकताच जाहीर केला. 

दहावी आणि बारावीतील गुणांवर पुढील आयुष्य ठरते, असे पहिलीपासून मुलांना ठसविणारे बहुसंख्य पालक सध्या आपल्या प्रत्येकाच्या सभोवती दिसत आहेत. अर्थात शालेय शिक्षण केवळ कल निश्चितीसाठी असतो हे सन १९८३ मध्ये पाबळ (ता. शिरूर) येथे थेट अमेरिकेतील शास्त्रज्ञाची नोकरी सोडून आलेल्या डॉ. एस. एस. कलबाग यांनी स्थानिकांना सांगितले आणि पुण्यातील भारतीय शिक्षण संस्थेच्या मदतीने कलानुसार शिक्षण आणि शिक्षणानुसार करिअर अशी पदविका विकसित केली. एक वर्षाच्या निवासी पदविकेसाठी स्वत: कलबाग यांनी आपली हयात पाबळमध्ये घालविली. 

आतापर्यंत या आश्रमातून ३ हजार विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्यातील १८०० विद्यार्थी उद्योजक म्हणून आहेत. विशेष म्हणजे उर्वरित विद्यार्थीही उद्योगांमध्ये नोकरीच्या निमित्ताने सामावल्याची माहिती संचालक रणजित शानबाग यांनी दिली. 

गरजा भागाव्यात आणि रोजगार वाढावा  दुग्धोत्पादन, पोल्ट्री, सुतारकाम, लोहारकाम, वेल्डिंग, वायरमन ते संगणक तज्ज्ञ अशा ग्रामीण भागात आवश्यक त्या सगळ्याच विषयांचा व समावेश या अभ्यासक्रमात केलेला आहे. सन १९८३ ते सन १९९२ पर्यंत हा कोर्स ग्रामीण तंत्रज्ञानाची ओळख या नावाने संबोधला जात असे. मात्र, सन १९९२ नंतर हा कोर्स ग्रामीण तंत्रज्ञान पदविका (DBRT) या नावाने संबोधला जात असून त्याला राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थान दिल्ली National Institute of Open Schooling (NIOS) यांनी विशेष मान्यताही दिली आहे.

प्रवेश सुरू, निवासी आणि निसर्गरम्य परिसरात या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अत्यंत निसर्गरम्य परिसरातील विज्ञान आश्रम कॅंपसमध्ये निवासाची सुविधा आणि जेवणाचीही सुविधा अत्यंत स्वस्त दरात करण्यात आलेली आहे. मुलींसाठी तर फीमध्ये मोठे सवलतही देण्यात आलेली आहे. याबाबत संस्थेशी स्वत: संपर्क करून माहिती घेण्याचे आवाहन (मोबाईल नं. ७०५७४१४७२०, ९५७९७३४७२०) विज्ञान आश्रमचे वतीने करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com