अंबाबरवा अभयारण्यात चार वाघांचे दर्शन

अंबाबरवा अभयारण्यात चार वाघांचे दर्शन
अंबाबरवा अभयारण्यात चार वाघांचे दर्शन

अकोला ः मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्रातील अंबाबरवा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला झालेल्या प्राणिगणनेत सुखद असा अनुभव आला. या गणनेत चार वाघांचे दर्शन झाल्याने निसर्गप्रेमी सुखावले आहेत.  या गणनेत या अभयारण्यात ५४० वन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली असून, मागील वर्षी येथे केवळ ७८ प्राण्यांची नोंद झाली होती. गणनेसाठी अभयारण्यात असलेल्या २५ पाणवठ्यांजवळ तेवढीच मचाणे उभारण्यात आली होती. गणनेसाठी स्थानिकसह नागपूर, औरंगाबाद, पुणे तसेच गुजरात राज्यातील काही वन्यजीव प्रेमींनी सहभाग घेतला. या वर्षी ५४० वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. चार वाघ, सहा बिबट, १९ अस्वल, एक तडस, तीन रानगवे, १४ सांबर, २४ भेळकी, दोन सायाळ, २७ म्हसण्या उद, ४७ नील गायी, १०५ जंगली डुकरे, १३३ माकडे, १५५ इतर प्राण्यांची नोंद झाली. प्राणिगणनेच्या दृष्टीने अंबाबारवा अभयारण्यात कृत्रिम व नैसर्गिक मिळून २५ पाणवठे होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com