agriculture news in Marathi, Vijay Javandhiya says, farmer got loss due to excess use of technology, Maharashtra | Agrowon

तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराने शेतकरी देशोधडीला ः विजय जावंधिया
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

नागपूर ः ‘संकरित बियाण्यांचा करा पेरा, लक्ष्मी येईल घरा'' असा नारा हरितक्रांतीच्या वेळी दिला गेला. परंतु, आज घरच्या लक्ष्मीच्या अंगावरील मंगळसूत्रही गहाण ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तंत्रज्ञानाचा अविवेकी आणि अविचारी स्वीकार हेच यामागील मूळ असल्याचा आरोप शेती प्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी केला. 

नागपूर ः ‘संकरित बियाण्यांचा करा पेरा, लक्ष्मी येईल घरा'' असा नारा हरितक्रांतीच्या वेळी दिला गेला. परंतु, आज घरच्या लक्ष्मीच्या अंगावरील मंगळसूत्रही गहाण ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तंत्रज्ञानाचा अविवेकी आणि अविचारी स्वीकार हेच यामागील मूळ असल्याचा आरोप शेती प्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी केला. 

कस्तुरबा भवन येथे रविवारी (ता. २५) आयोजित सेफ्टी फूड याविषयावरील परिषदेत ते बोलत होते. अफसर जाफरी, नाना आखरे, अमिताभ पावडे, वसंत फुटाणे, सुधीर पालीवाल, उमेंद्र दत्त, दिनावाज वारिया, कविता कुरुंगट्टी, डॉ. बालासुब्रमणी, डॉ. शरद पवार, ललीत बहाळे यांची याला उपस्थित होती. बीजोत्सवअंतर्गत ही परिषद घेण्यात आली.

विजय जावंधिया म्हणाले, की शेतकरी संघटनेचे अध्यक्ष (कै.) शरद जोशी यांनी पीटीआय (प्राईज, टेक्‍नॉलॉजी आणि इन्फ्रास्ट्रक्‍चर) असा मंत्र दिला होता. तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना ते शेतकऱ्यांसाठी फायद्याचे कसे आणि या तंत्रज्ञानाकरिता संसाधनाची उपलब्धता हा विचार त्यातून (कै.) जोशी यांनी मांडला. परंतु, आज केवळ तंत्रज्ञानाचाच विचार होताना दिसत आहे. उत्पन्न हा घटकच का कुणास ठाऊक दुर्लक्षीत करण्यात आला आहे. त्यामुळे अन्न सुरक्षेचा विचार करताना शेतकरी सुरक्षेला प्राधान्य द्यावेच लागणार आहे. त्यामुळेच एचटीबीटी समर्थक तणनाशक उत्पादक कंपन्यांचे एजंट भासत आहेत. नुसत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकरी समृध्द होतो. तर मग तो यापूर्वी का होऊ शकला नाही. तो आर्थिकदृष्ट्या समृध्द नसल्यानेच त्याला साधी मजुरांची मजूरी देणेही शक्‍य होत नाही. त्याला आणखी गाळात घालण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले आहे. सरकारने देखील विषमुक्‍त अन्नाला वेगळे निकष लावत वेगळी किंमत ठरवावी. तेव्हाच ही चळवळ उभी राहील.

गावोगावी होणार प्रसार
परिषदेत विषमुक्‍त अन्नाचा प्रसार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता भिंतीपत्रक व इतर साधने वापरली जातील. गुजरातमधील कपील शहा, डॉ. नीलेश हेडा, दिनावेज वारीया, कविता कुरुंगट्टी यांनी जी. एम. तसेच एच. टी. तंत्रज्ञान कसे धोकादायक आहे. याविषयी विचार मांडले. १७२ देशांनी अद्यापही हे तंत्रज्ञान स्वीकारले नाही केवळ २४ देशांमध्ये ते वापरले जाते. काही देशांमध्ये एचटी.च्या परिणामी तणाची प्रतिकारकता वाढली आणि सुपरविड तयार झाले. असे अनेक पर्यावरण आणि मानवावरील धोके मांडण्यात आले.

इतर अॅग्रो विशेष
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...