agriculture news in marathi, Vijay Jawandhiya express views in election | Page 2 ||| Agrowon

नागनाथ जातो, सापनाथ सत्तेवर येतो...

विजय जावंधिया, ज्येष्ठ शेतकरी नेते
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

या  वर्षी शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍नच निवडणुकीतून जादूची कांडी फिरविल्यागत गायब झाले आहेत. या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या आयाराम गयाराम यांचीच चर्चा होत आहे. त्यावरुनच सत्ताप्राप्ती हाच राजकारण्याचा धर्म, पंथ असल्याचे सिद्ध करतो. निष्ठावान कार्यकर्ता ही ओळखही या निवडणुकीपासून संपली आहे. सामान्यांना मात्र काश्‍मीरमधील कलम ३७० याच मुद्यावर संमोहित करून ठेवण्यात आले आहे. त्यावरूनच शेतकरी आणि सामन्यांना या निवडणुकीत निव्वळ गृहीत धरण्यात आल्याचे सिद्ध होते. काश्‍मीरमधील कलम ३७० रद्द केल्याचा मुद्दा राज्याच्या निवडणुकीत चर्चिलाच जाणे अपेक्षित नाही.

या  वर्षी शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍नच निवडणुकीतून जादूची कांडी फिरविल्यागत गायब झाले आहेत. या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या आयाराम गयाराम यांचीच चर्चा होत आहे. त्यावरुनच सत्ताप्राप्ती हाच राजकारण्याचा धर्म, पंथ असल्याचे सिद्ध करतो. निष्ठावान कार्यकर्ता ही ओळखही या निवडणुकीपासून संपली आहे. सामान्यांना मात्र काश्‍मीरमधील कलम ३७० याच मुद्यावर संमोहित करून ठेवण्यात आले आहे. त्यावरूनच शेतकरी आणि सामन्यांना या निवडणुकीत निव्वळ गृहीत धरण्यात आल्याचे सिद्ध होते. काश्‍मीरमधील कलम ३७० रद्द केल्याचा मुद्दा राज्याच्या निवडणुकीत चर्चिलाच जाणे अपेक्षित नाही. परंतु धर्मांधता वाढल्याने त्याचेच भांडवल केले जात आहे. अडीच वर्षांपासून कर्जमाफी सुरूच आहे आणि यापुढेही सुरू राहणार असे सांगितले जाते. 

कापसाच्या भावाचा प्रश्‍नही कायम आहे. अनेक भागात ओला दुष्काळ आहे, जून-जुलैत कोरडा दुष्काळ पडला. अशाप्रकारचे स्थानिक स्तरावरील चर्चा किंवा मुद्दे मात्र मागे पडले आहेत. महाराष्ट्रात ५० टक्‍क्यांपेक्षा अधिक शहरी जनता झाल्याने त्यांनाच गृहीत धरून आश्‍वासने दिली जात आहे. त्याच आधारावर कांद्याची निर्यात बंद करून दर नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यापूर्वी सत्तेच्या केंद्रस्थानी शेतीप्रश्‍नच राहत होते. मात्र गेल्या पाच वर्षात राजकारणातून शेतकरी आणि शेतीप्रश्‍न संपुष्टात आले आहेत. यापूर्वी राजकारणाचा केंद्रबिंदू शेतकरी होता. आता मात्रा ताटात लोणचे जसे चवीपुरते असते तसाच शेतीप्रश्‍नाचा निवडणुकीत उपयोग होतो. 

नव्या पिढीला शेतीत राहायचे नाही. हे देखील राजकारण्यांनी जाणले आहे. त्यामुळेच विकासाच्या भूलथापा दिल्या जात आहेत. सुपर हायवे, वायफाय अशा भूलभुलैयात तरुण पिढीला गुंतून ठेवले जात आहे. शासकीय निवृत्त झालेला माणूस तरी पूर्वी गावात राहायचा आता यापुढे मानसिकरीत्या निवृत्तच गावात राहतील, अशीच स्थिती निर्माण झाली आहे. जमिनीचे पडलेले तुकडे हे देखील शेतीपासून शेतकरी दुरावण्याचे कारण सांगता येईल. त्यामुळेच शेतकऱ्यांची मुले शेतीत राहण्याऐवजी पाच हजार रुपयांची नोकरी शहरात करतात. 

यापुढे शेतीची अवस्था आणखी विदारक होणार असल्याचे संकेत आहेत. हे रोखता यावे याकरिता तेलंगणामध्ये दहा हजार रुपये प्रति एकर असे धोरण सरकारने आखले आहे. त्याला एकरी शेतीची मर्यादा नाही, अशाप्रकारचे धोरण राबवावेच लागेल. उद्योगपतींकडून राजकारणासाठी पैसे मिळतो. त्यामुळे राजकारणी देखील उद्योग आणि उद्योकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आसुसलेले असतात. शेतीचे मात्र याउलट आहे. यापूर्वी दूधाने पोळल्याने शेतकरी आता ताकही फुंकून पीत आहेत. त्यामुळे त्यांचाही राजकारणावरचा विश्‍वास संपुष्टात आला आहे. नागनाथ जातो, सापनाथ सत्तेवर येतो, इतकाच फरक पडतो. हे देखील कारण शेतीप्रश्‍न या निवडणूकीत चर्चेला नसण्यामागे सांगता येईल.
- विजय जावंधिया (ज्येष्ठ शेतकरी नेते)

(शब्दांकन ः विनोद इंगोले)


इतर अॅग्रो विशेष
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...