agriculture news in Marathi, Vijay Jawandhiya, says boom in cotton due to halt in maize production and demand for sarki, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

रुपयाचे अवमूल्यन, सरकीतील तेजीने कापूस बाजारा सुधारला: विजय जावंधिया

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 एप्रिल 2019

पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५०० रुपययांपर्यंत गेले आहेत. मात्र ही वाढ केंद्र सरकारने हमीभावात वाढ केल्याने झाली नाही, तर रुपयाचे सतत झालेले अवमूल्यन आणि सरकीच्या दरात तेजीमुळे कापसाचे दर वाढले आहेत, असे विश्‍लेषण शेतीप्रश्‍नाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी मांडले आहे. 

पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५०० रुपययांपर्यंत गेले आहेत. मात्र ही वाढ केंद्र सरकारने हमीभावात वाढ केल्याने झाली नाही, तर रुपयाचे सतत झालेले अवमूल्यन आणि सरकीच्या दरात तेजीमुळे कापसाचे दर वाढले आहेत, असे विश्‍लेषण शेतीप्रश्‍नाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी मांडले आहे. 

मोदी सरकारने २०१८-१९ च्या हंगामासाठी कापसाच्या हमीभावात १०९० रुपयांची वाढ करून ५४५० रुपये प्रतिक्वंटल देण्याची घोषणा केली. ही वाढ २४ टक्केच आहे. डॉ. मनमोहनसिंग सरकारने २०१८-०९ च्या हंगामात हमीभावात २०२० रुपयांवरून ३००० रुपये केला होता. ही वाढ ५० टक्के होती. तेव्हा हा दर जागतिक आणि देशातील बाजारातही मिळत नव्हता. सर्व कापूस सीसीआय आणि नाफेडने विकत घेतला होता. 

आज मोदी सरकारला ५४५० रुपये दराने कापूस खरेदी करावी लागत नाही. कारण बाजारात कापसाचे दर ६५०० रुपये आहेत. कापूस हंगाम सुरू झाला, तेव्हा बाजारात कापसाचे दर ५५०० ते ५८०० रुपये दरम्यान होते. मध्यंतरी दर ५२०० रुपये ते ५४०० रुपये झाले होते. आता दर परत वाढले आहेत. दरात सुधारणा झाली त्याचे मुख्य कारण रुपयाचे अवमूल्यन व सरकीच्या दरातील तेजी आहे. मध्यंतरी अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध वाढेल आणि भारतातून निर्यात वाढून दर वाढतील अशी चर्चा होती. परंतु यंदा कापसाची निर्यात वाढली नसून कमी झाली आहे. तर आयात वाढली आहे. मागील वर्षी २० लाख गाठींची आयात झाली होती. यंदा त्यात वाढ होऊन २७ लाख गाठींची आयात होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात रुईच्या दरात तेजी नाही. मागच्या हंगामात रुईचे दर ८० ते ९० सेंट प्रति पाउंड होते व सध्या ८७ सेंटवर आहेत. सध्या ७० रुपये प्रतिडॉलर विनिमय दर आहे तर मागील वर्षी ६२ रुपये होता. 

एक क्विटंल कापसामधून ३४ किलो रुई व ६४ किलो सरकी मिळते. ७० रुपयांच्या विनिमय दरामुळे १३३.९७ प्रतिकोलो प्रमाणे ३४ किलो रुईचे ४५५५ रुपये होतात. सरकीचा दर २७०० रुपये प्रतिक्विंटल होता. सरकीचे एका किलोचा दर २७ रुपये प्रमाणे ६४ किलोचे १७२८ रुपये होतात. याचाच अर्थ एक क्विंटल कापसाचे ४५५५+ १७२८- ६२८३ रुपये होतात. हाच हिशेब ६२ रुपये विनिमय दरावर सरकीचे भाव २००० रुपये या प्रमाणे केला तर, ३४ किलो रुईचे ४०२६ रुपये होतात व ६४ किलो सरकीचे २० रुपये दराने १२८० रुपये होतात. एकूण ४०२६+१२८०-५३०६ रुपये होतात. याचाच अर्थ असा की विनिमय दर ६२ रुपये आणि सरकी २००० रुपये क्विंटल असती तर आज बाजारात ५००० ते ५३०० रुपये दर मिळाला असता. 

अमेरिकेतील मका पीक किडीने फस्त केल्याने यंदा सरकीच्या दरात तेजी आली आहे. भारतातही मक्याचे दर १४०० रुपयांवरून २००० रुपये प्रतिक्विंटलवर पोचले आहेत. म्हणून सरकीच्या ढेपेच्या दरात तेजी आली आहे. सध्या २४०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल सरकीच्या ढेपेचे दर आहेत. 

अमेरिकेच्या कापूस बाजारात १९९४ मध्ये १ पाउंड रुईचा भाव १ डॉलर १० सेंट होता. तो आज २०१९ मध्ये ८० ते ९० सेंट आहे. १९९४ मध्ये भारतात २५०० रुपये प्रतिक्विंटल कापसाचे दर होते. त्या वेळी विनिमय दर २५ रुपये होता. त्यामुळे रुपयाचे अवमूल्यन आणि सरकीच्या दरातील तेजी झाली नसती तर कापूस उत्पादकांचे काय झाले असते? अमेरिकेचा कापूस शेतकरी कमी दरात कापूस विकतो तरी आत्महत्या करत नाही, कारण त्यांना ४.६ बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे अनुदान मिळते.


इतर अॅग्रोमनी
पपईला जागेवरच १८ रुपये प्रतिकिलो दरजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम सुरू झाला असून,...
गुजरातमधून मागणी मंदावल्याने गूळ दरांत...कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुजरातला...
वाशीम : त्रुट्यांमुळे ‘किसान सन्मान’...वाशीम  ः पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा...
हळद, गवार बीच्या फ्युचर्स किंमतीत घटया सप्ताहात हरभरा, गवार बी, हळद व गहू यांच्या...
नागपुरी संत्रा चीनच्या 'प्रोटोकॉल'...नागपूर : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार...
संकेश्‍वरी मिरचीचा ‘ठसका’ यंदा गायबकोल्हापूर : गेल्या महिन्यातील अतिवृष्टीने यंदा...
वायदा बाजारात सोयाबीन, कापसाच्या...या सप्ताहात खरीप मका, हळद, गवार बी यांच्यात घट...
कडधान्यातील स्वयंपूर्णता यंदा ठरणार...नवी दिल्ली ः देशात यंदा मॉन्सूनच्या उशिरा...
देशात रब्बी मूग पेरणीत २९ टक्के घटनवी दिल्ली: देशात रब्बी हंगामाच्या पेरणीला...
सोयाबीनशिवाय सर्व पिकांच्या वायदा...या सप्ताहात गहू व गवार बी वगळता इतर सर्व...
राज्यात कापूस दर हमीभावापेक्षा कमीचजळगाव  ः राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षा...
‘कॉन्टॅक्टलेस लेंडिंग’ पद्धतीची...नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १०००...
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला...पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा...
तीन वर्षांत हळदीच्या दरात दीड हजार...सांगली ः सांगली जिल्ह्यासह अन्य भागांत  ...
मका, हळद, गव्हाच्या किमतीमध्ये वाढरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात...कोल्हापूर  : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार...
अर्थशास्त्राला शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न...सन २०१९ चे अर्थशास्त्राचे नोबेल भारतीय वंशाचे...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
पावसामुळे कोल्हापुरात गुळाची आवक घटलीकोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून सुरू...
उत्तर प्रदेशात उसाला प्रतिक्विंटल ३०...नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील साखर...