बाजारातील मंदीच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणारः विजय जावंधिया

विजय जावंधिया
विजय जावंधिया

पुणे ः अमेरिकेच्या कापूस बाजारात ३० टक्क्यांनी मंदी आली असून, भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट कापसाची आयात झाली आहे. गेल्यावर्षी ६ हजार २०० ते ६  हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विक्री करणाऱ्या शेतकरी यंदा ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दराने कशी विक्री करणार? अशा प्रश्‍न उपस्थित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न कशाप्रकारे दुप्पट होईल यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन करावे, अशा मागणीचे पत्र शेतकरी संघटनेचे नेते आणि बाजार अभ्यासक विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांना दिले आहे.  केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने २०१८०-१९ या वर्षासाठी कापसाची आधारभूत किंमत ५ हजार ४५० रुपये जाहीर केली आहे. मात्र, यावर्षी रुपयाचे अवमूल्यन आणि सरकीच्या दरांमधील वाढीमुळे कापसाला आधारभूत किमतीपेक्षा जास्त दर मिळाले. एक क्विंटल कापसापासून सुमारे ६४ किलो सरकी मिळते. सरकीला प्रतिकिलोला सुमारे ३० रुपये दर मिळतो. यानुसार फक्त सरकीतून सुमारे १ हजार ९२० रुपये मिळतात. याचा विचार केला तर, एक क्विंटल कापसाचे दर ४ हजार ३१२ अधिक सरकाचे १ हजार ९२० रुपये याप्रमाणे कापसाला प्रतिक्विंटल  ६ हजार २३२ रुपये दर होतो. या पार्श्‍वभूमीवर २०१९-२० या वर्षासाठी कृषी मूल्य आयोगाने कापसाची आधारभूत किंमत ५ हजार ५५० रुपये जाहीर केली आहे.  दरम्यान, अमेरिकेमध्ये रुईचे दर ७० सेंट प्रती पाऊंडच्या खाली आली आहेत. तर भारताचा रुपया पण ७० रुपयांपर्यंत स्थिर आहे. तसेच, जगात सोयाबीनच्या ढेपेमध्ये मंदी असल्यामुळे भारतात देखील सरकीच्या ढेपेला मंदी आहे. नवीन कापूस जेव्हा बाजारात येईल, त्या वेळी सरकीचे दर देखील पडणार आहेत. तसेच कापसाची आयातदेखील वाढत असून या पार्श्‍वभूमीवर व्यापारी आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी करणार आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कशी होईल? असा प्रश्‍न पंतप्रधान नरेंद्र यांच्याकडे उपस्थित करून आपण मार्गदर्शनासह आणण योग्य निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com