agriculture news in Marathi, Vijay jawandhiya says, how will make farmers income double in recession period, Maharashtra | Agrowon

बाजारातील मंदीच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणारः विजय जावंधिया
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

पुणे ः अमेरिकेच्या कापूस बाजारात ३० टक्क्यांनी मंदी आली असून, भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट कापसाची आयात झाली आहे. गेल्यावर्षी ६ हजार २०० ते ६  हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विक्री करणाऱ्या शेतकरी यंदा ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दराने कशी विक्री करणार? अशा प्रश्‍न उपस्थित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न कशाप्रकारे दुप्पट होईल यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन करावे, अशा मागणीचे पत्र शेतकरी संघटनेचे नेते आणि बाजार अभ्यासक विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांना दिले आहे. 

पुणे ः अमेरिकेच्या कापूस बाजारात ३० टक्क्यांनी मंदी आली असून, भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट कापसाची आयात झाली आहे. गेल्यावर्षी ६ हजार २०० ते ६  हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विक्री करणाऱ्या शेतकरी यंदा ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दराने कशी विक्री करणार? अशा प्रश्‍न उपस्थित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न कशाप्रकारे दुप्पट होईल यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन करावे, अशा मागणीचे पत्र शेतकरी संघटनेचे नेते आणि बाजार अभ्यासक विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांना दिले आहे. 

केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने २०१८०-१९ या वर्षासाठी कापसाची आधारभूत किंमत ५ हजार ४५० रुपये जाहीर केली आहे. मात्र, यावर्षी रुपयाचे अवमूल्यन आणि सरकीच्या दरांमधील वाढीमुळे कापसाला आधारभूत किमतीपेक्षा जास्त दर मिळाले. एक क्विंटल कापसापासून सुमारे ६४ किलो सरकी मिळते. सरकीला प्रतिकिलोला सुमारे ३० रुपये दर मिळतो. यानुसार फक्त सरकीतून सुमारे १ हजार ९२० रुपये मिळतात. याचा विचार केला तर, एक क्विंटल कापसाचे दर ४ हजार ३१२ अधिक सरकाचे १ हजार ९२० रुपये याप्रमाणे कापसाला प्रतिक्विंटल  ६ हजार २३२ रुपये दर होतो. या पार्श्‍वभूमीवर २०१९-२० या वर्षासाठी कृषी मूल्य आयोगाने कापसाची आधारभूत किंमत ५ हजार ५५० रुपये जाहीर केली आहे. 

दरम्यान, अमेरिकेमध्ये रुईचे दर ७० सेंट प्रती पाऊंडच्या खाली आली आहेत. तर भारताचा रुपया पण ७० रुपयांपर्यंत स्थिर आहे. तसेच, जगात सोयाबीनच्या ढेपेमध्ये मंदी असल्यामुळे भारतात देखील सरकीच्या ढेपेला मंदी आहे. नवीन कापूस जेव्हा बाजारात येईल, त्या वेळी सरकीचे दर देखील पडणार आहेत. तसेच कापसाची आयातदेखील वाढत असून या पार्श्‍वभूमीवर व्यापारी आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी करणार आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कशी होईल? असा प्रश्‍न पंतप्रधान नरेंद्र यांच्याकडे उपस्थित करून आपण मार्गदर्शनासह आणण योग्य निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...