दुय्यम खात्यामुळे विजय वडेट्टीवार नाराज? 

Vijay Vadettiwar angry for secondary ministry?
Vijay Vadettiwar angry for secondary ministry?

नागपूर ः मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपावरून महाआघाडीत सहभागी असलेल्या सर्वच पक्षांच्या आमदारांमध्ये नाराजी दिसू लागली आहे. काँग्रेसचे माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा नाराज असल्याचे कळते. त्यांचा समावेश कॅबिनेट मंत्री म्हणून झाला असला तरी दुय्यम खाती दिल्याने ते फारसे खूश नाहीत. खातेवाटप विषयावर आपणास कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही, तुम्हाला जे लिहायचे ते लिहा, असे ते बोलले. त्यामुळे ते फारसे खूश नसल्याचे स्पष्ट होते. 

मूळचे शिवसैनिक असलेल्या वडेट्टीवार चौथ्यांदा विधानसभेत निवडून आले आहे. युतीच्या काळात ते वनविकास महामंडळाचे अध्यक्ष होते. याच काळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. नारायण राणे यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. राणे यांनी सेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबतच वडेट्टीवार हेसुद्धा काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसतर्फे चिमूरमधून ते निवडून आले होते. त्यांना राज्यमंत्री म्हणून बढती मिळाली होती. त्या वेळी त्यांच्याकडे ऊर्जा, सिंचन, आदिवासी कल्याण, पर्यावरण व वन राज्यमंत्री ही खाती होती. मोदी लाटेतही ते ब्रह्मपुरी येथून निवडून आले होते. राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेल्यानंतर काँग्रेसने त्यांना विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद दिले होते.

ऊर्जा खात्यासाठी होते इच्छुक  विरोधात असताना विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधीपक्ष नेते होते. काँग्रेसच्या कोअर कमिटीतही ते होते. त्यामुळे पहिल्याच मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होईल, अशी अपेक्षा होती. मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना स्थान देण्यात आले. विदर्भात मोठ्या प्रमाणात विद्युत प्रकल्प असल्याने ऊर्जा खाते मिळावे यासाठी ते इच्छुक होते. मात्र, त्यांना मदत व पुनर्वसन, ओबीसी ही खाते देण्यात आले. ती खाती फारशी महत्त्वाची समजली जात नाहीत. या उलट त्यांच्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांना महत्त्वाची खाती मिळाली आहेत. यावर त्यांनी बोलण्यासही टाळले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com