agriculture news in marathi, vijay wadettiwar target state government on jalyukt shiwar scheme, nagpur, maharashtra | Agrowon

जलयुक्‍त शिवार अभियानाचे खरे लाभार्थी जाहीर करा ः विजय वडेट्टीवार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

नागपूर ः चार वर्षांत वीस हजार कोटी रुपये जलयुक्‍त शिवार अभियानावर खर्च करण्यात आले. त्यामुळे पाणीपातळी वाढल्याचा दावा केला जात असतानाच राज्यात गेल्या वीस वर्षांत पडला नाही असा भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे ‘जलयुक्‍त शिवार’चे खरे लाभार्थी कोण हे जाहीर करण्याची मागणी विधिमंडळातील कॉंग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

नागपूर ः चार वर्षांत वीस हजार कोटी रुपये जलयुक्‍त शिवार अभियानावर खर्च करण्यात आले. त्यामुळे पाणीपातळी वाढल्याचा दावा केला जात असतानाच राज्यात गेल्या वीस वर्षांत पडला नाही असा भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे ‘जलयुक्‍त शिवार’चे खरे लाभार्थी कोण हे जाहीर करण्याची मागणी विधिमंडळातील कॉंग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

विदर्भातील दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांनाही ही मागणी केली. आमदार वडेट्टीवार म्हणाले, ‘‘बुलडाणा जिल्हयातील ८५ टक्‍के गावे टंचाईग्रस्त आहेत. जून महिन्यात ही संख्या १०० टक्क्यांवर जाईल. अशी गंभीर परिस्थिती असताना या जिल्हयात शासनाने दुष्काळ निवारणासाठी एक रुपयाही खर्च केला नाही. बुलडाणा जिल्ह्यातील काही गावांमध्ये बारमाही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. ही बाब अत्यंत गंभीर असताना त्या गावांमध्ये साधी पाणीपुरवठा योजनाही कार्यान्वीत करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही.

बुलडाणा जिल्ह्यात भूजलपातळी खालावली आहे. कूपनलिका तसेच तलाव कोरडे पडले आहेत. दुष्काळग्रस्त भागात जात त्या भागातील नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजनांची मागणी केली जाईल. बुलडाण्याप्रमाणेच विदर्भाच्या इतर सहा जिल्ह्यांतील परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात तशीच आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी व जनावरांसाठी तातडीने चारा छावण्यांची व्यवस्था अपेक्षित आहे. परंतु सरकार या मुद्द्यावर गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

‘...अन्यथा तीव्र आंदोलन करू’
दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी सरकारला भाग पाडले जाणार आहे. सरकारने उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यास राज्य स्तरावर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला.

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...