जळगाव जिल्ह्यात ग्राम कृषी विकास समित्या स्थापन होणार

भडगाव, जि. जळगाव : शेतकऱ्यांना गावातच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे. कारण, ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
Village Agriculture Development Committees will be established in Jalgaon district
Village Agriculture Development Committees will be established in Jalgaon district

भडगाव, जि. जळगाव  : शेतकऱ्यांना गावातच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे. कारण, ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी विकास समितीची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे प्रत्येकापर्यंत कृषी विभागाच्या योजना पोहचविणे सोपे होणार आहे. तर, गावातील जे ठराविक व्यक्तीच वारंवार योजनेचे लाभ घेत होते, त्यांना चाप बसणार आहे. 

या १२ सदस्यीय समितीत लोकप्रतीनीधी, कर्मचारी, प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश असेल. जिल्ह्यात सुमारे ११५२ ग्रामपंचायती व त्यांच्याशी संबंधित गावांमध्ये या समित्या असतील, अशी माहिती मिळाली. शेतीच्या विकासासाठी गावांमधील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनीयोग करणे, विविध योजना, प्रकल्प यामधून हाती घ्यावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४९ (४) नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमधे या समितीची स्थापना होईल.

सरपंच हे या समितीचे पदसिध्द अध्यक्ष, उपसरपंच हे पदसिध्द सदस्य असतील. ग्रामसेवक हे सचिव व कृषी सहायक सहसचिव राहतील. एक ग्रामपंचायत सदस्य, तीन प्रगतशील शेतकरी, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनी वा शेतकरी गटाचा एक सदस्य, महिला बचत गटांचा एक सदस्य, कृषी पुरक व्यवसायिक शेतकरी, तलाठ्याचा समावेश असेल.

विशेष म्हणजे या समतीत निम्म्या सदस्य महिला असतील. समितीची मुदत ही ग्रामपंचायतीच्या कार्यकाळाइतकीच राहील. ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतरर ४५ दिवसांत ही समिती गठित करणे बंधनकारक राहील. पदसिध्द सदस्यांव्यतीरिक्त इतर सदस्यांची निवड ही ग्रामसभेच्या मान्यतेने करावी लागेल. 

या समितीची दर महिन्याला एकदा बैठक घेणे आवश्यक आहे. शासनाच्या कृषी विषयक योजना ग्रामपंचायत क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्याबरोबर प्रचार व प्रसार करणे, योजनांचा नियमित आढावा घेऊन त्या लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

याशिवाय स्थानिक स्तरावरील हवामान, पाऊस, पाण्याची उपलध्दता, जमिनीचा पोत या बाबी लक्षात घेऊन विविध पीक लागवडीसंबधीचे नियोजन समितीला करावे लागेल. ग्राम कृषी विकास समित्या कार्यान्वित झाल्यानंतर पंचायत समतीचे कृषी विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी (पंचायत समिती), कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकाऱ्यांना उपस्थित राहावे लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com