agriculture news in marathi, village heads complaints of agriculture employee to commissioner | Agrowon

ऐन दुष्काळात गावात भेटेना कृषी कर्मचारी : सरपंचांची तक्रार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 2 जानेवारी 2019

पुणे : राज्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असताना अडचणीतील शेतकऱ्यांना कृषिसल्ला किंवा योजना सांगण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी गावात भेटत नाहीत, अशा तक्रारी सरपंचांनी कृषी आयुक्तालयाकडे केल्या आहेत.  त्यामुळे ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक उपकरण बसवा, असे साकडे आयुक्तांना घालण्यात आले.  

पुणे : राज्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असताना अडचणीतील शेतकऱ्यांना कृषिसल्ला किंवा योजना सांगण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी गावात भेटत नाहीत, अशा तक्रारी सरपंचांनी कृषी आयुक्तालयाकडे केल्या आहेत.  त्यामुळे ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक उपकरण बसवा, असे साकडे आयुक्तांना घालण्यात आले.  
 कृषी विभागाचे मुख्य काम कृषी विद्यापीठांचा सल्ला गावशिवारात पोचविणे आणि सरकारी योजना बांधावर नेणे हेच असले तरी हजारो कर्मचारी असूनही त्यांचा शेतकऱ्यांशी संबंध तुटलेला आहे. “क्षेत्रीय पातळीवर मोजके कर्मचारी कष्टपूर्वक कामे करतात. मात्र कामाच्या नावाखाली बहुतेक कर्मचारी ग्रामपंचायतींकडे फिरकत नाहीत,” असे राज्यातील सरपंचांच्या शिष्टमंडळाने कृषी आयुक्तांच्या चर्चेत स्पष्ट केले. 

कृषी सहायक किंवा पर्यवेक्षक कुठून येतात, कुठे जातात, शिवारात किंवा ग्रामपंचायतीत कुणाला भेटतात याविषयी आम्हाला काहीही माहिती नसते. ग्रामपंचायतीत कृषी सहायक आल्यास कृषी विभागाच्या योजना तसेच सल्ला मिळण्यास मदत होईल. त्यामुळे ग्रामपंचायतीत बायोमेट्रिक उपकरण बसवावे. एका कर्मचाऱ्याकडे अनेक गावे असतात. त्यामुळे किमान एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार करून त्यात योजना व कामांची माहिती द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली.

राज्यात कृषी विभागाकडून जलयुक्त शिवार अभियानासह जलसंधारणाच्या होत असलेल्या कामांचा आढावा घ्यावा. सीसीटी, मजगी अनेक प्रकारचे बांध खोदल्याचे कागदोपत्री दिसते. मात्र पुन्हा ही कामे बुजल्याचेही सांगितले जाते. अनेक भागांत पूर्ण शेततळीदेखील बुजल्याचे सांगतात. 

कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी घेतलेल्या काही निर्णयांबाबत सरपंच परिषदेने अभिनंदनदेखील केले. दुष्काळात वैयक्तिक लाभाची कामे करण्यासाठी अधिकाराचे केलेले विकेंद्रीकरण, शेततळी अस्तरीकरण, जलयुक्त शिवारासाठी प्रोत्साहनात्मक निधी हे निर्णय उपयुक्त असल्याचे चर्चेत स्पष्ट करण्यात आले. 
या वेळी परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील, उपाध्यक्ष दत्ता काकडे, पुणे सरपंच परिषदेचे अध्यक्ष शशिकांत मोरे, सागर माने (कोल्हापूर), निशिगंधा माळी व कौशल जहागिरदार (सोलापूर), पुरुषोत्तम चौधरी (जळगाव), प्रदीप कदम (सांगली) व तसेच इतर सरपंच उपस्थित होते.


इतर अॅग्रो विशेष
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजपासून...पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे...
भारत-चीन तणावाचा कापूस निर्यातीला फटकाजळगाव ः जगभरात वस्त्रोद्योगाची चाके फिरण्यास...
खानदेशात कापूस खरेदीला ‘ब्रेक’जळगाव ः शासकीय कापूस खरेदीला खानदेशात मागील...
बोगस बियाणे प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा...पुणे ः सोयाबीनच्या बोगस बियाणेप्रकरणी मुख्यमंत्री...
लॉकडाउनमध्ये १४ लाख क्विंटल फळ,...लातूर ः ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी सुरू...
राज्यात ठिबक अनुदानासाठी १९१ कोटी रुपये...सोलापूर : राज्यात यंदा दोन लाख १३ हजार ७५५...
पीककर्ज द्या, अन्यथा पोलिसांत तक्रारसोलापूर : पीककर्जाचे शासकीय नियमानुसार वितरण न...
जिल्हा बॅंकांनी ठोठावला राज्य बॅंकेचा...सोलापूर : ‘कोरोना’मुळे अडचणीत सापडलेल्या...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...
सांगली जिल्ह्यात ड्रॅगन फ्रुटचे क्षेत्र...सांगली  : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस जोर धरणारपुणे  : राज्यात पावसाचा जोर वाढण्यासाठी पोषक...
जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस :...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
मराठवाड्यात पीककर्ज पुरवठ्याचं घोडं...औरंगाबाद  : कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना कर्ज...
बीबीएफ तंत्रासह प्रयोगशीलतेतून साधली...बुलडाणा जिल्ह्यात मेहकरपासून २५ किलोमीटरवरील अति...
बा, विठ्ठला.. देशाला कोरोनामुक्त आणि...पंढरपूर, जि. सोलापूर : महाराष्ट्रासह अवघ्या...
सेंद्रिय भाजीपाला, केळीसह मूल्यवर्धित...कोल्हापूर जिल्हा म्हटलं की ऊस आणि भात शेती समोर...
मराठवाड्यात जोरदार पावसामुळे काही...औरंगाबाद : मराठवाड्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस...