Agriculture news in marathi To the village of Melghat There will be supply of solar energy | Page 3 ||| Agrowon

मेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा पुरवठा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 जून 2021

धारणी तालुक्यातील चोपण या दुर्गम गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे ‘मेडा’च्या सहकार्याने सौर ऊर्जाधारित पारेषण प्रकल्प आकारास आला असून, लवकरच तो कार्यान्वित होईल.

अमरावती : धारणी तालुक्यातील चोपण या दुर्गम गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे ‘मेडा’च्या सहकार्याने सौर ऊर्जाधारित पारेषण प्रकल्प आकारास आला असून, लवकरच तो कार्यान्वित होईल. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतीच या प्रकल्पाची तपासणी केली. या प्रकारे संपूर्ण गावाला वीज उपलब्ध करून देणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प आहे.

जिल्ह्यात मेळघाटातील धारणी तालुक्यातील चौराकुंड ग्रामपंचायतीअंतर्गत चोपण हे दुर्गम गाव आहे. तेथील १६१ घरांना या प्रकल्पामुळे वीज जोडणी मिळणार आहे. मेळघाटातील दुर्गम भागात विद्युतीकरणासाठी वन, ऊर्जा व विविध विभागांच्या समन्वयातून प्रयत्न होतच आहेत. मात्र, शक्य तिथे पारंपरिक वीजपुरवठ्याबरोबरच अपारंपरिक ऊर्जा सुविधांबाबतच्या योजनाही भरीवपणे राबवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्या बाबत प्रशासनातर्फे ‘मेडा’च्या माध्यमातून ठिकठिकाणी सौर ऊर्जाधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय आला आहे. मेळघाटातील चोपण या दुर्गम गावात प्रकल्प आकारास आला आहे. त्याची तपासणी व आवश्यक बाबींच्या पूर्ततेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी उपस्थित होत्या.

वीज नसलेल्या गावांसाठी हा सोलर मायक्रो ग्रीड प्रकल्प राबवला जातो. त्याद्वारे गावाला २४ तास वीजपुरवठा शक्य होतो. चोपण येथील प्रकल्प २४ किलोवॉट क्षमतेचा आहे. त्याची प्रकल्प किंमत ४२.४४ लाख असून, धारणीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे ‘मेडा’ला सहकार्य लाभले आहे.  सौर ऊर्जेवरती संपूर्ण गावामध्ये पथदिवे व घरांमध्ये वीजजोडणी केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...