agriculture news in marathi Village survey work Drone Survey: Dr. Vipin | Page 3 ||| Agrowon

गावठाण भूमापन कामाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

नांदेड : ‘‘भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्यातर्फे राज्यातील गावठाण भूमापन न झालेल्या गावांचे ड्रोन गावठाण भूमापन काम सुरू आहे.

नांदेड : ‘‘भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्यातर्फे राज्यातील गावठाण भूमापन न झालेल्या गावांचे ड्रोन गावठाण भूमापन काम सुरू आहे.

नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथील गावठाण भूमापन सर्वेक्षण कामाची मंगळवारी (ता.१९) जिल्हाधिकारी डॉ. विपिन व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी पाहणी केली. 

डॉ. विपिन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी नागरिकांना गावठाण भूमापन कामाचे महत्त्व पटवून दिले. यासाठी ग्रामविकास विभागाच्या २२ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयान्वये जीआयएस आधारे गावांच्या गावठाणातील मिळकतींचा सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात येईल. संगणकीकृत नकाशे, सनद व मिळकत पत्रिका तयार होणार आहेत. या गावठाण भुमापनामुळे जिल्ह्यातील गावठाणातील घरांच्या नकाशा व सीमा निश्चित होतील. मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे, त्याची नोंद होईल. ग्रामस्थांचे नागरी हक्काचे संवर्धन होईल. गावातील रस्ते, शासनाच्या, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमण रोखता येईल. 

मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे मिळकत धारकांना घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. ग्रामपंचायतींना गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होतील. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुरेखा सेठिया यांनी प्रत्यक्ष गावठाण ड्रोनसर्व्हेची माहिती दिली. 

भारतीय सर्व्हेक्षण विभागाचे सर्व्हेक्षक एस. विनोदकुमार, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यु. डी. तोटावाड आदी उपस्थित होते. नांदेड व हिमायतनगर तालुक्यात सुरु असलेल्या सर्व्हेक्षण कामात ग्रामपंचायत कर्मचारी व जनतेने सर्व्‍हेक्षण करणाऱ्या पथकांना सहकार्य करावे व मिळकतीचे सिमांकन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुरेखा सेठिया यांनी केले.


इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची काढणी प्रत्येक भाजीपाला पिकाचा काढणी कालावधी हा...
पांडुरंग साखर कारखाना उताऱ्यात...सोलापूर : पांडुरंग साखर कारखान्याने २५ लाख ७७...
अकोला झेडपीच्या कृषी विभागाचे दहा...अकोला : जिल्हा परिषद कृषी विभागाला आगामी आर्थिक...
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार...नाशिक : जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीमुळे झालेल्या...
कपाशीचा उत्पादन खर्च कमी करण्याची गरज ः...नांदेड ः ‘‘जगाच्या तुलनेत आपल्या देशात कपाशीची...
खानदेशातील तुरीच्या आवकेत ४० टक्के घटजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
कीटकनाशक फवारणीला अनुदान द्या : आंबा...मुंबई : कोकण किनारपट्टीच्या भागात १८ व १९...
पारनेर : महावितरणच्या विरोधात शेतकरी...निघोज, ता. पारनेर : विहिरीत पाणी असूनही पिकांना...
खानदेशात ऊसगाळप राहणार मार्चअखेरपर्यंत...जळगाव ः  खानदेशात सुमारे १६ लाख टन ऊस गाळप...
कोल्हापुरात आग्या मधमाशा जतन,...कोल्हापूर : आग्या मधमाशा जतन आणि संवर्धनासाठी...
शेतकऱ्यांना अडचणीत आणू नका ः डॉ. पवारनाशिक : ‘‘वीज महावितरणच्या मनमानी...
संभाव्य निर्बंध, लॉकडाउनमुळे द्राक्ष...नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात...
सिंधुदुर्गमध्ये होणार ड्रोनद्वारे होणार...सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या स्वामित्व योजनेतर्गत...
मराठीला अभिजात दर्जा मिळविणारच :...मुंबई : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला,...
खामसवाडीत नुकसानग्रस्त पिकांची होणार...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : परिसरात १९ फेबुवारी...
किमान २५ टक्के शेतीमालावर प्रक्रिया...जालना : ‘‘उत्पादित केलेल्या किमान २५ टक्के...
नगर जिल्ह्यात पाच हजारांवर शेतकऱ्यांना...नगर ः जिल्ह्यातील २०१९ - २० चा खरीप व रब्बी हंगाम...
सोसायट्यांच्या वसुलीपूर्वी प्रोत्साहन...सातारा : आता मार्च महिन्यात सोसायट्यांची...
केळीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनएकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामुळे पिकास...
सकाळी थंड, तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...