तिवरे गावाला वादळाचा फटका 

रत्नागिरी ः गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या धरण फुटीनंतर रविवारी (ता. १९) पुन्हा एकदा तिवरे गावावर निसर्ग कोपलेला असल्याचे दिसून आले आहे. वादळी वाऱ्याने गावातील अनेक घरांचे छप्पर उडाले. विजेचे खांब, झाडे कोसळल्याने गावावर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे.
तिवरे गावाला वादळाचा फटका 

रत्नागिरी ः गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या धरण फुटीनंतर रविवारी (ता. १९) पुन्हा एकदा तिवरे गावावर निसर्ग कोपलेला असल्याचे दिसून आले आहे. वादळी वाऱ्याने गावातील अनेक घरांचे छप्पर उडाले. विजेचे खांब, झाडे कोसळल्याने गावावर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. 

गेल्यावर्षी तिवरे गावात अतिवृष्टीमुळे धरण फुटून मोठी जीवित व वित्तहानी झाली होती. यातून गाव सावरत असतानाच वादळी पावसाने पुन्हा एकदा गावात हाहाकार माजवला. या पावसात काही ठिकाणी झाडेही कोसळून मार्ग बंद झाले आहेत. तालुक्याच्या एका टोकाला आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने चिपळूणात लगेच याची माहिती पोहचली नाही. 

शिवसेनेचे मंगेश शिंदे तसेच ग्रामस्थ अजित चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली. मात्र, सायंकाळ झाल्याने आणि अंतर ही दूरचे असल्याने सोमवारीच नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतले. दरम्यान, तालुक्याचा पूर्व विभागातील शिरगाव पोफळी परिसरातही वादळी वाऱ्यासह गारांचा मुसळधार पाऊस पडल्यामुळे कराड -चिपळूण मार्गावर दोन ठिकाणी झाड उन्मळून पडल्यामुळे वाहतूक ठप्प होती. तर अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून गेल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. 

सर्वाधिक नुकसान पोफळी सय्यदवाडी परिसरात झाले आहे. अकरा केव्हीकेचे विद्युत पोल तुटल्यामुळे कुंभार्ली कोडफणवणे येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शिरगावला दोन दिवस पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती सरपंच अनिल शिंदे यांनी दिली. 

जेसीबीच्या साहाय्याने काही वेळातच रस्त्यावरील झाडे बाजूला करून कराड-चिपळूण मार्ग सुरू करण्यात आला. तर शिरगाव माजी सरपंच सुधीर शिंदे यांच्या निवासस्थानी झाड कोसळले. त्यामुळे त्याठिकाणी असलेले अकरा केव्हीकेचे पोल तुटल्यामुळे कोडफणवणे कुंभार्ली येथील वीज पुरवठा बंद पडला. तर पोफळी गावाला सुद्धा त्याचा फटका बसला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com