Agriculture news in Marathi Village wise planning of kharif: Minister of Agriculture | Agrowon

खरिपाचे गावनिहाय नियोजन ः कृषिमंत्री

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 एप्रिल 2021

खरिपाचे नियोजन गावातच करण्यासाठी ग्रामस्तरीय कृषी समितीची स्थापना करण्यात येत असून, संपूर्ण गावाची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन गावाचे, तालुक्‍याचे जिल्हावार नियोजन प्रस्तावित आहे, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

कोल्हापूर ः खरिपाचे नियोजन गावातच करण्यासाठी ग्रामस्तरीय कृषी समितीची स्थापना करण्यात येत असून, संपूर्ण गावाची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन गावाचे, तालुक्‍याचे जिल्हावार नियोजन प्रस्तावित आहे. सर्व पालकमंत्र्यांकडे हे नियोजन आल्यानंतर सर्वसमावेशक आराखडा तयार करणार आहोत. यावर चर्चा करण्यासाठी कृषी अधिकारी पातळीवर आम्ही बैठका घेत आहोत, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

यंदाच्या खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा कोल्हापूर येथे शुक्रवारी (ता. ९) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच रासायनिक खतांचे वाढलेले दर तातडीने कमी करावेत, अशी मागणी राज्याने केंद्राकडे पत्राद्वारे केली असल्याचीही माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे दिली.

श्री. भुसे म्हणाले, की खरिपाच्या पार्श्‍वभूमीवरच खत कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात खतांचे दर वाढविल्याने शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यामुळे राज्य सरकारने हे दर कमी करण्याची मागणी केंद्राला केली आहे. डीएपी खताच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी या खतापासून बाजूला जाऊन युरियाला प्राधान्य देतील, अशी शक्‍यता आहे. यामुळे नजीकच्या काळात दोन लाख टनांचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे. यामुळे खत मागणीचा ताण कमी होईल.

तसेच खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा बियाणांची व खतांची उपलब्धता याला प्राधान्य देण्यात येत आहे. गेल्या वर्षी सोयाबीन बियाणाबाबत अडचण निर्माण झाली होती. यंदा कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांकडून सोयाबीन बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. यंदा नावीन्यपूर्ण प्रयोगावर भर देण्यात येणार आहे. हे प्रयोग पाहून त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांना कसा होईल याचे नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच तसेच मागणी असलेल्या वाणांची लागवड करुन शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहित करणार असल्याचे श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

या वेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, खासदार धैर्यशील माने, उल्हास पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारकडे खतांचे वाढीव दर कमी करण्याबाबत मागणी केलेली आहे. त्याचबरोबर अगोदरच्या दरातही सवलत मिळावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
- दादा भुसे, कृषिमंत्री

 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...
भुईमूग खर्चालाही महागअकोला ः उन्हाळी हंगामात यंदा लागवड केलेल्या...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
जोरदार पावसाची शक्यता पुणे : मराठवाडा ते मध्य प्रदेशचा मध्य भाग या...
बाजार समित्याबंदमुळे खरीप नियोजन ‘...पुणे: कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन...
शेततळे अनुदानाचे वीस कोटी वितरित नगर ः राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल...
साखर कारखान्यांकडून ९२ टक्के ‘एफआरपी’...कोल्हापूर : राज्यात एप्रिलअखेर एकूण रकमेच्या ९२...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत पुणे : राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
मॉन्सून यंदा वेळेवर पुणे : सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक...
शेतकऱ्यांकडे २९ लाख क्विंटल घरचे बियाणे पुणे ः कृषी विभागाने ग्रामबिजोत्पादन मोहिमेतून...
मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत...
पावसाचा प्रभाव वाढणार पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची...