agriculture news in marathi The villagers came together for a clean, beautiful cemetery | Page 3 ||| Agrowon

स्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थ आले एकत्र

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

आव्हई (ता.पूर्णा, जि. परभणी) येथील ग्रामस्थ स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमीसाठी एकत्र आले आहेत. कृषिभूषण सूर्यकांतराव देशमुख-झरीकर यांचे स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमी अभियान आणि झेडपीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या वृक्षवल्ली फाउंडेशनच्या माध्यमातून या उपक्रमाने गती घेतली आहे.

परभणी : जिल्ह्यातील आव्हई (ता.पूर्णा) येथील ग्रामस्थ स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमीसाठी एकत्र आले आहेत. कृषिभूषण सूर्यकांतराव देशमुख-झरीकर यांचे स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमी अभियान आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या वृक्षवल्ली फाउंडेशनच्या माध्यमातून या उपक्रमाने जिल्ह्यामध्ये गती घेतली आहे. अनेक गावामध्ये अभियानाला चांगली सुरवात झाली आहे.

आव्हई येथील येथे स्मशानभूमीची मोठी जागा असून बाजूलाच तलाव आहे. मात्र ही जागा उकिरडे आणि वेड्या बाभळींनी वेढली आहे. मात्र झरी, खांबेगाव, पोखर्णी आणि देऊळगाव दुधाटे या स्मशानभूमीचा आदर्श घेऊन गावकऱ्यांनी या जागेवरील सर्व बोरी बाभळी काढून विविध उपयुक्त झाडे लावून सुशोभित करायचा संकल्प केला आहे.

ग्रामपंचायतीचे प्रशासक प्रभाकर भोसले, मुख्याध्यापक प्रल्हाद कऱ्हाळे, ग्रामगीतेचे अभ्यासक डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार यंत्रणेच्या साहाय्याने झाडे,झुडपे खोदून काढण्यात आली.स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमीचा आराखडा तयार करून वृक्षवल्ली फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याठिकाणी स्मृती उद्यान आणि स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमी लवकरच उभारण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.


इतर ग्रामविकास
लोकसहभागातून तयार होईल ग्रामविकासाचा...शाश्‍वत ग्रामविकास करताना विकासाच्या विविध...
सुधारित तंत्राद्वारे बदलला गावचा...गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे...
गावशिवाराचा शाश्‍वत विकास करणारी ‘एफईएस’आनंद (गुजरात) येथे नोंदणीकृत असलेल्या फाउंडेशन...
दुर्गम सावंगी गावात घडले एकीतून कृषी...गावातील युवकांना दिशा देण्यासोबतच त्यांच्यातील...
नैसर्गिक वारसा जपत देवडे गाव समृद्धीकडेऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेले रत्नागिरी...
ग्राम पर्यटन, पर्यावरण संवर्धनातील...गेली पंधरा वर्षे रत्नागिरी येथील निसर्गयात्री ही...
पायाभूत सुविधांसह शेतीतून प्रगतिपथावर...रस्ते, बंधारे उभारणी, सांडपाणी व्यवस्थापन,...
पिंपळगाव वाघाच्या शिवारात लोकसहभागातून...कित्येक वर्षापासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
लोकसहभागातून हिंगणगाव झाले ‘पाणी’दारपाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी...
चुडावा बनले रेशीम शेतीचे क्लस्टरचुडावा (ता.पूर्णा,जि.परभणी) गावातील येथील...
स्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थ...परभणी : जिल्ह्यातील आव्हई (ता.पूर्णा) येथील...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
गावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...
बारीपाडा शिवारात रुजली शाश्वत शेती,...बारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि...
जलसंधारणातून प्रगतीकडे पाऊल कोळपांढरी (ता.शहादा,जि.नंदुरबार) येथील...
डोंगरदऱ्यातील कुमशेत आर्थिक उन्नतीच्या...एकेकाळी ओसाड माळरानावर वसलेले व टँकरचे गाव म्हणून...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...