Agriculture news in Marathi, Villagers jam due to Gramsevak's agitation | Agrowon

ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे गावगाडा ठप्प
टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

सातारा ः जिल्ह्यातील  ग्रामसेवकांनी प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले बेमुदत काम बंद आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच राहिल्याने ग्रामीण गावगाडा थबकला आहे. दाखले देण्यापासून ते निविदा काढण्यापर्यंतची कामे रखडली आहेत. ग्रामसेवकांनी आंदोलनाची तीव्रता वाढविली असून, लेखी आश्‍वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. जिल्ह्यातील एक हजार ४९० पैकी कंत्राटी ग्रामसेवक असलेल्या मोजक्‍या ग्रामपंचायतींचे कामकाज सुरू आहे. बहुतांश ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे. 

सातारा ः जिल्ह्यातील  ग्रामसेवकांनी प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले बेमुदत काम बंद आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच राहिल्याने ग्रामीण गावगाडा थबकला आहे. दाखले देण्यापासून ते निविदा काढण्यापर्यंतची कामे रखडली आहेत. ग्रामसेवकांनी आंदोलनाची तीव्रता वाढविली असून, लेखी आश्‍वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. जिल्ह्यातील एक हजार ४९० पैकी कंत्राटी ग्रामसेवक असलेल्या मोजक्‍या ग्रामपंचायतींचे कामकाज सुरू आहे. बहुतांश ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे. 

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण करावे, ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करावा, ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता बंद करून पदवीधर ग्रामसेवक नेमणूक करावी, ग्रामविकास अधिकारी सजे व पदे वाढवावीत, वेतन त्रुटी दूर कराव्यात, २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, आदर्श ग्रामसेवक राज्य, जिल्हास्तर यांना आगाऊ वेतनवाढ करावी, एक गाव एक ग्रामसेवक पद निर्मिती करावी, ग्रामसेवकांची अतिरिक्‍त कामे कमी करावीत, या मागणीसाठी राज्यातील ग्रामसेवकांनी नऊ ऑगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. 

या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील जिल्हा परिषदा आणि विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे, ग्रामविकास विभाग आणि ग्रामसेवकांच्या संघटनांच्या बैठका केल्या. त्यामध्ये सकारात्मक निर्णय झाले. मात्र, त्याबाबत लेखी आश्‍वासन दिले नसल्याने हे आंदोलन अधिक तीव्र केले आहे. २३ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामांना मंजुरी देणे, त्यांची निविदा प्रक्रिया राबविणे, टेंडर मंजुरी देऊन ती कामे सुरू करणे आदी कामे ठप्प झाली आहेत. याशिवाय लोकांना दाखले देणे, उतारे देणे, नोंदी करणे, शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे आदी कामे पूर्णपणे थांबविली आहेत.

सरकार व ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. मात्र, आमच्या विविध मागण्यांबाबत शासनाचा लेखी आदेश मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे.
- अभिजित चव्हाण, कोरेगाव तालुकाध्यक्ष, ग्रामसेवक युनियन. 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतींमध्ये विविध कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू असताना ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे कामकाज ठप्प आहे. सरकारने ग्रामसेवकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तत्काळ आंदोलनातून मार्ग काढावा.
- जावेद मुल्ला, सरपंच, तांबवे (ता. कऱ्हाड) 
 

इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...