Agriculture news in marathi Villages are self-sufficient, while states and countries are self-sufficient: Bhujbal | Agrowon

खेडे स्वयंपूर्ण, तर राज्य, देश स्वयंपूर्ण ः भुजबळ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

नाशिक : ‘‘महसूल विभागाच्या माध्यमातून प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण झाले, तर राज्य आणि देश स्वयंपूर्ण होईल’’, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक : ‘‘कोविड- १९ च्या या परिस्थितीत राज्याचे अर्थचक्र सुरळीतपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी ही महसूल विभागाची  आहे. येणाऱ्या काळातही या विभागामार्फत तत्परतेने काम होईल. तसेच महसूल विभागाच्या माध्यमातून प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण झाले, तर राज्य आणि देश स्वयंपूर्ण होईल’’, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीने सोमवार (ता.३) नाशिक विभागाचा महसूल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नागपूर येथून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक येथून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री भुजबळ, मालेगाव येथून कृषिमंत्री दादाजी भुसे, यासह विभागीय आयुक्त राजाराम माने, पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे आदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले,‘‘कोणतीही परिस्थिती असो महसूल विभागाची जबाबदारी ही अत्यंत महत्वाची असते. या अनुषंगाने केलेल्या कामाची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन शाबासकीची थाप मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे काम करताना सकारात्मक उर्जा प्रत्येकाला मिळते. तंत्रज्ञानामुळे कामाच्या गतीसोबतच त्याचे स्वरूप देखील बदलले आहे.’’ 

महसूल विभाग हा शासन व प्रशासनाचा कणा आहे. या महसूल वर्षात ‘आठ अ’ हा ऑनलाइन उतारा देण्याची सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामाबद्दल सत्कार करण्यात आला. नाशिक विभागातील अडीच ते तीन हजार महसूल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

‘नागरिकांना न्याय मिळावा’

महसूल विभाग हा सर्व विभागांचे प्रतिनिधीत्व करीत आहे. इतर विभागांवर या विभागाचे नियंत्रण असते. येणाऱ्या काळात सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या माध्यमातून न्याय द्यावा, अशी अपेक्षा भुसे यांनी व्यक्त केली.
 


इतर बातम्या
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
आदिवासी बेरोजगारांसाठी औषधी वनस्पतीवरील...कर्जत, जि. रायगड : आदिवासींच्या उत्कर्षासाठी...