जळगावातील गावे केवळ कागदांवर स्वच्छ

जळगावातील गावे केवळ कागदांवर स्वच्छ
जळगावातील गावे केवळ कागदांवर स्वच्छ

जळगाव : कागदांवर हगणदारीमुक्त झालेल्या गावांत अजूनही उघड्यावर शौचास बसण्याचे प्रकार दिसत आहेत. प्रत्यक्षात स्वच्छता अजूनही दिसत नसल्याचा दावा जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षातील सदस्यांनी केला. 

दोन सदस्यांनी यासंदर्भातील आपला अनुभव ‘ॲग्रोवन''कडे सांगितला. त्यानुसार जिल्ह्यात सर्वप्रथम भुसावळ तालुका १०० टक्के हगणदारीमुक्त झाला. यानिमित्त संबंधित पंचायत समितीचा जाहीर सत्कार जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाने केला. परंतु, प्रत्यक्षात मात्र भुसावळमधील अनेक गावांमध्ये हगणदाऱ्या आहेत. त्यात गोजोरा, कुऱ्हे पानाचे, पिंप्रीसेकम आदी गावांमध्ये गावात प्रवेश करतानाच हगणदाऱ्या दिसतात. याचा अर्थ काय? फक्त कागदावरच हगणदारीमुक्ती झाली. मार्च २०१९ पर्यंत जिल्हा हगणदारीमुक्त म्हणून जाहीर होऊ शकतो. कारण कागदावर तसे मोठे काम दिसत आहे. परंतु प्रत्यक्षात जेथे सार्वजनिक शौचालये बांधली, व्यक्‍तिगत शौचालयांसंबंधी कामकाज झाले. तेथे त्या शौचालयांचा वापर केला जातो का? कामे अपूर्ण राहिली का? अनुदान १०० टक्के दिले का? ग्रामसेवकांनी किती प्रामाणिक प्रयत्न केले, याची फेरतपासणी करायला हवी.

यावल तालुक्‍यात आदर्श गाव म्हणून जाहीर झालेल्या गावातही हगणदारी आहे. जिल्हा परिषदेचे ६८ सदस्य आहेत. यापैकी निम्म्यांच्या गावांमध्ये उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार दिसतात. ही सर्व गावे खऱ्या अर्थाने हगणदारीमुक्त करावीत, असा मुद्दाही या सदस्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितला. 

अनेक गावांमध्ये शौचालयांची कामे १०० टक्के पूर्ण झाल्याचे दाखविले जाते. परंतु ती वाळू प्रश्‍नामुळे अपूर्ण आहेत. काही ठिकाणी वादामुळे शौचालयांची कामे बंद पडली. अनेक गावांमध्ये सार्वजनिक शौचालयांच्या मागणीचे प्रस्ताव पाठविले. तरीही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने त्याबाबत काम केले नसल्याचा आरोप सदस्यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com