agriculture news in marathi, Villages from Sangli Districts to get water form Karnataka | Agrowon

जत तालुक्यातील ४२ गावांना पाणी देण्यास कर्नाटक सकारात्मक
अभिजित डाके
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

सांगली ः जत तालुक्‍यातील ४२ गावांतील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी कर्नाटक राज्याने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यातील तुबची बबलेश्‍वर उपसा सिंचन योजनेतून या ४२ गावांना पाणी दिले जाणार आहे. याबाबत दोन्ही राज्यांतील पाटबंधारे विभागाने सर्वेक्षण केले असून वरिष्ठ पातळीवर बैठकाही घेतल्या जात आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

सांगली ः जत तालुक्‍यातील ४२ गावांतील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी कर्नाटक राज्याने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यातील तुबची बबलेश्‍वर उपसा सिंचन योजनेतून या ४२ गावांना पाणी दिले जाणार आहे. याबाबत दोन्ही राज्यांतील पाटबंधारे विभागाने सर्वेक्षण केले असून वरिष्ठ पातळीवर बैठकाही घेतल्या जात आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

जत तालुक्‍यातील ४२ गावांना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी देणे शक्‍य नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून या गावातील शेतीला पाणी मिळावे, अशी मागणी या गावातून होते आहे. त्यासाठी आघाडी सरकारने पुढाकार घेतला होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात याबाबत ठोस पावले उचलली गेली नव्हती. त्यामुळे या गावांना पाणी मिळणे कठीण झाले होते. पाणीटंचाईमुळे या गावांतील शेतकऱ्यांनी स्थलांतर करू अशी भूमिका घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर सरकारने याबाबत बैठका घेतल्या.

सांगली पाटबंधारे विभागात गेल्या महिन्यात कर्नाटक राज्यातील पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी जून २०१७ मध्ये कर्नाटक राज्यातील प्रकल्पांना भेटी दिल्या. कृष्णा नदीवरील तुबची बबलेश्‍वर उपसा सिंचन योजना व त्याची वितरण प्रणाली ही जत तालुक्‍यातील वंचित गावांच्या जवळ आहे. या योजनेच्या शेवटच्या टिकोटा वितरणापासून जत सीमा अंतर सुमारे १० किलोमीटरचा आहे. त्यामुळे जत पूर्व भागातील गावांना तिकोटा वितरणापासून पाणी देणे शक्‍य असल्याचा प्राथमिक अंदाज पाटंबधारे विभागाचा आहे. त्यामुळे सांगली पाटंबधारे विभाग आणि कर्नाटक पाटबंधारे विभागाची सांगली येथे  बैठक झाली. 

याबाबबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे या गावातील पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत होईल. सध्या कर्नाटक राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे या ४२ गावांना पाणी देण्यासाठी कायदेशीर करार झालेला नाही. हा कायदेशीर करार लवकरच होईल, असा विश्‍वास सांगलीच्या पाटबंधारे विभागाला आहे. 

कर्नाटक राज्याने पावसाळ्यात ४ टीएमसी पाणी जत तालुक्‍यातील ४२ गावांना द्यावे. त्याबदल्यात महाराष्ट्र राज्याने उन्हाळ्यात त्यांना तेवढेच पाणी द्यावे, असा दोन्ही राज्यांमध्ये सामंजस्य करार झाला तर कायमस्वरुपी पाणीप्रश्‍न मिटण्यास मदत होईल. त्यासाठी दोन्ही राज्याने असा करार करण्यासाठी पुढे आले पाहिजे.

असे दिले जाणार पाणी
कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले तुबची बललेश्‍वर उपसा सिंचन योजनेतून जत तालुक्‍यातील धुळकरवाडी येथील तलावात पाणी देण्याचे नियोजन आहे. या तलावातून सुमारे २४ गावांना पाणी मिळणार आहे. त्यासाठी कर्नाटकच्या तुबची बललेश्‍वर उपसा सिंचन योजनेतून जुलै ते नोव्हेंबर म्हणजेच पावसाळ्यात नदीतून वाहून जाणारे ४ टीएमसी पाणी हे जत तालुक्‍यात देण्यात येईल.

इतर ताज्या घडामोडी
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...
पूरग्रस्त शेतकऱ्यांना कुळीथ, वालाचे...रत्नागिरी : या वर्षी पडलेल्या मुसळधार...
मराठवाड्यातील मध्यम, लघुप्रकल्पांत २९...औरंगाबाद : अर्धेअधिक पावसाळा लोटल्यानंतरही...
`ग्रीन होम`मध्ये सेकंड होम, फार्म हाउस...पुणे : ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या ‘ग्रीन होम एक्स्पो...
कृषी क्षेत्रात योगदान देणाऱ्या ...पुणे   : जिद्द, कष्ट, अथक परिश्रमाच्या...
लागवडयोग्य `पोटखराब`ची नोंद होणार सात...पुणे  ः पोटखराब जमीन लागवडीयोग्य केली असेल...
औरंगाबादमध्ये शेवगा २५०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली...नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या...नाशिक : चालू वर्षी पावसाचे आगमन उशिरा झाल्यानंतर...
ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या...नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती...
धुळे जिल्ह्यात किसान सन्मान योजनेत दोन...धुळे : जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी...