agriculture news in marathi, villages select for jalyukt shivar scheme, parbhani, maharashtra | Agrowon

परभणीतील १०५ गावांची ‘जलयुक्त’साठी निवड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 9 मे 2018
परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी परभणी जिल्ह्यातील १०५ गावांची निवड करण्यात आली. चौथ्या वर्षासाठी गावांची निवड करण्यात आली असली, तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षीतील अनेक कामे अद्याप रखडलेलीच आहेत. ही कामे पूर्ण करून यंदा निवड करण्यात आलेल्या गावांतील कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे.
 
परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी परभणी जिल्ह्यातील १०५ गावांची निवड करण्यात आली. चौथ्या वर्षासाठी गावांची निवड करण्यात आली असली, तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षीतील अनेक कामे अद्याप रखडलेलीच आहेत. ही कामे पूर्ण करून यंदा निवड करण्यात आलेल्या गावांतील कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे.
 
२०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त करून सर्वांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानचे यंदाचे हे चौथे वर्षे आहे. २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत १७० गावांची निवड करण्यात आली होती. 
 
पहिल्या वर्षी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे लोकसहभाग तसेच शासकीय यंत्रणा यांच्याकडून अनेक गावांत जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली. त्यांचे चांगले परिणाम दिसून आले. अनेक गावे टॅंकरमुक्त झाली.
 
२०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील अनुक्रमे १६० आणि १२८ गावांची अभियानात निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये करावयाच्या जलसंधारणाच्या कामांचे आराखडे तयार करण्यात आले. परंतु अनेक गावांतील कामे अद्याप अपूर्ण आहेत.
 
जलयुक्त शिवार अभियानच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील कामे अर्धवट असताना २०१८-१९ मधील म्हणजेच चौथ्या वर्षामध्ये जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील १०५ गावांची निवड करण्यात आली आहे.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...