agriculture news in marathi, villages waiting for prize of jalyukt shivar scheme, nagar, maharashtra | Agrowon

‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जुलै 2019

नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान राबवून जलसंधारणाची उत्कृष्ट कामे करणाऱ्या गावांचा जलसंधारण विभागातर्फे पुरस्कार देऊन गौरव केला जातो. मात्र तीन वर्षांपासून पुरस्कारच जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे उत्कृष्ट कामे करणाऱ्या अनेक गावांसह व्यक्ती, संस्थांना जलयुक्त शिवार अभियानाच्या पुरस्कारांची प्रतीक्षा आहे.

नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान राबवून जलसंधारणाची उत्कृष्ट कामे करणाऱ्या गावांचा जलसंधारण विभागातर्फे पुरस्कार देऊन गौरव केला जातो. मात्र तीन वर्षांपासून पुरस्कारच जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे उत्कृष्ट कामे करणाऱ्या अनेक गावांसह व्यक्ती, संस्थांना जलयुक्त शिवार अभियानाच्या पुरस्कारांची प्रतीक्षा आहे.

राज्यातील अनेक भागांना सातत्याने दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे अशा गावांतील पाणीटंचाई निवारणासाठी सातत्याने मोठा निधी खर्च करावा लागतो. मात्र दुष्काळावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासह सिंचनाची लोकसहभागातून कामे व्हावीत यासाठी २०१५ पासून राज्यात विविध जलसंधारणाच्या योजनांचा ताळमेळ घालून जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. तीन वर्षे सातत्याने टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाह अन्य निकषांनुसार गावे निवडून गावांत जलसंधारणाची कामे केली.

गावात एकोपा राहवा, लोकसहभाग वाढावा आणि अन्य गावांनाही प्रोत्साहन मिळावे, यासाठी जलसंधारणाचे उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांचा राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर रोख रकमेसह पारितोषिकांनी गौरव केला जातो. याशिवाय संस्था, व्यक्ती, उत्कृष्ट अधिकारी, पत्रकार यांनाही या पुरस्काराने गौरवले जाते. त्यासाठी सबंधित गावांकडून प्रस्ताव मागवले आहेत.

२०१६ पासून पुरस्काराच्या रकमेत वाढ केली असल्याचा अध्यादेश शासनाने काढला आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हे पुरस्कारच जाहीर झालेले नाहीत. आतापर्यंत अभियान सुरू झाल्यापासून फक्त एका वर्षाचे (२०१५) पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. कृषी विभाग, माहिती विभागामार्फत प्रस्ताव घेऊन त्याचे परीक्षण केले जाते. आता पुरस्कार कधी जाहीर होणार याची कृषी विभागात सातत्याने विचारणा होत असून, अनेक गावांना पुरस्काराची प्रतीक्षा आहे. 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...