agriculture news in Marathi, villages which in POKARA project will get micro Irrigation subsidy, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘पोकरा’तील शेतकऱ्यांनाही मिळणार सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

प्रकल्पात निवड असलेल्या पहिल्या टप्प्याच्या गावांमधील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत. त्यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर योजनेतून ६० ते ७० टक्क्यांपर्यंत नियमानुसार अनुदान देय आहे.
-मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

अकोला  ः राज्यात दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या १५ जिल्ह्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पात निवड झालेल्या गावांतील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांना या योजनेतून ७० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

भूजल साठा तसेच जमिनीच्या आरोग्यावर हवामान बदलाचा विपरीत परिणाम झाला आहे. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अल्प भूधारकांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खोऱ्यातील भू-भाग निसर्गतःच क्षारपड आहे. त्यामुळे तेथे सिंचनाला मर्यादा येत आहेत. याचाही परिणाम अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. हवामान बदलाने उदभवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या हेतूने जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने पोकरा प्रकल्प सुरू करण्यात आला. यामधून शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे साहित्य घेण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेप्रमाणेच ‘पोकरा’त सूक्ष्मसिंचन साहित्यासाठी नियम आहेत. मात्र अनुदानाचे प्रमाण हे ७० टक्क्यांपर्यंत आहे. या प्रकल्पातून सूक्ष्म सिंचन साहित्य घेणाऱ्या शेतकऱ्यांना विद्यमान योजनेच्या तुलनेत तातडीने अनुदान उपलब्ध होते. शिवाय अनुदानाची टक्केवारीसुद्धा अधिक आहे. पोकरा प्रकल्पात पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेता येऊ शकतो. 

असे आहेत लाभार्थी निवडीचे निकष

  • पोकरा प्रकल्पांतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेसाठी अत्यल्प व अल्प भूधारकांची अनुक्रमे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग शेतकरी व सर्वसाधारण या प्राधान्यक्रमानुसार निवड केली जाईल.
  • शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा असावी.
  • उपलब्ध सिंचन स्रोतातील पाण्याचा विचार करून तेवढ्या क्षेत्रासाठी सूक्ष्म सिंचनाला लाभ दिला जाईल.
  • वीज पंपाकरिता कायम स्वरूपी जोडणी आवश्यक
  • ज्या पिकाकरिता संच बसविण्यात येणार त्या पिकांची नोंद सात-बारा उताऱ्यावर हवी.

असे असेल अर्थसाह्य
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शासनाने निर्धारीत केलेल्या आर्थिक मापदंडानुसार अल्प व अत्यल्प भूधारक अनुसूचित जाती व जमातीमधील लाभार्थ्यांना ७० टक्के व सर्वसाधारण लाभार्थ्यांना ६० टक्के अनुदान दिले जाईल. यासाठी इच्छूक शेतकऱ्यांनी http://dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावेत. 


इतर ताज्या घडामोडी
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...