agriculture news in Marathi vinayakdada patil passed away Maharashtra | Agrowon

वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन 

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी (ता.२३) रात्री ११.४५ वाजता निधन झाले. नाशिक अमरधाम येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर शनिवार (ता.२४) अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात आपल्या खास शैलीने छाप पडणारे आणि कृषी, सहकार, वन संवर्धन, ग्रामविकास, साहित्य व सामाजिक क्षेत्रात ठसा उमटविणारे माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी (ता.२३) रात्री ११.४५ वाजता निधन झाले. नाशिक अमरधाम येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर शनिवार (ता.२४) अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शेतकरी कुटुंबातील विनायकदादा यांचा कुंदेवाडीचे (ता.निफाड) सरपंच ते मंत्री असा थक्क करणारा प्रवास आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात वेगवेगळी खाती सांभाळताना आपल्या कामाचा ठसा उमटविला. निफाड तालुका पंचायत समिती सभापती, निफाडचे आमदार, कुंदेवाडी विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राज्यमंत्रिपदाच्या दर्जासह त्यांना महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही पाच वर्षे देण्यात आले होते. त्यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले होते. 

‘पुलोद’ मंत्रिमंडळात शरद पवार यांचे ते सहकारी होते. साहित्यक्षेत्रातही त्यांचा व्यासंग मोठा होता आणि त्यांनी लेखक म्हणूनही लौकिक संपादन केला. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक अशा त्यांच्या या प्रयोगाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली गेली. त्यासाठी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 'बायफ' संस्थेचे विश्वस्त म्हणून काम करताना आदिवासी भागात आंबा, काजू, करवंद लागवड व विक्री यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. यासह आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ११ विधवा महिलांना विशेष मदत करून नवजीवन प्रकल्प त्यांनी राबविला. 

अंत्यसंस्कारावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, खासदार डॉ. भारती पवार, आमदार दिलीपराव बनकर, देवयानी फरांदे, सीमा हिरे,'मविप्र' संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार आदी उपस्थित होते. 

प्रतिक्रिया
कृषी, वनशेती, सहकार क्षेत्रात दूरदृष्टीचा ठसा उमटविणारे, राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे ज्येष्ठ नेतृत्व गमावले आहे. 
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

विनायकदादा पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत, साहित्याची जाण असलेले व सामाजिक बांधिलकी जपणारे राजकीय व्यक्तिमत्त्व हरपले. 
- खासदार शरद पवार 
 


इतर बातम्या
मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाची शक्यतापुणे ः बंगालच्या उपसागराच्या नैर्ऋत्य भागात ‘...
पीककर्जाची प्रकरणे तत्काळ मार्गी लावा...नाशिक ः ‘‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान...
नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या दरात...नाशिक : सोमवारी (ता. २३) जिल्ह्यातील प्रमुख बाजार...
कुरखेड्यात ‘महावितरण’वर शेतकऱ्यांचा...गडचिरोली : कृषी पंपाच्या फिडरवर सुरू असलेले...
बुलडाणा जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीने...बुलडाणा : जिल्ह्यात सुमारे १७४ गावांत गुलाबी...
मठपिंपळगाव-गोलापांगरीत द्राक्षात खर्च,...अंबड, जि. जालना : मठपिंपळगाव-गोलापांगरी परिसरातील...
`नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना...नांदेड : अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे...
बारामतीत हमीभावाने मका खरेदी सुरूपुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगरमध्ये कांदा चाळ अनुदानासाठी उपोषणनगर ः कृषी विभागाने पूर्वपरवानगी दिल्यानंतर...
जळगाव जिल्ह्यात केळीच्या विमा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून...
वीजजोड तोडल्यास आसूडाचा प्रहारकऱ्हाड,  जि.  सातारा : लॉकडाउन काळातील...
सांगली जिल्ह्यात दूध संकलनात २५ हजार...सांगली ः ऑक्टोबर ते जानेवारीअखेर हा दूध...
पीकविमा हप्ता २७ नोव्हेंबरपूर्वीच भरा...सिंधुदुर्ग : बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यातील...
‘वान’च्या पाण्याविरुद्ध नागरिकांचे धरणे अकोला : तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचे पाणी...
वीज जोडणी न देताच कृषीपंपाची लाखोंची...नांदेड : कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील पाच...
मराठवाड्यात कापसाच्या दरात किंचित...औरंगाबाद : खासगीत कापूस खरेदीचे दर किंचित...
परभणीत भाजपकडून वीजबिलांची होळी परभणी :  वाढीव वीज देयकांच्या निषेधार्थ...
खानदेशात ऊस लागवड वाढण्याची शक्यताजळगाव ः वाढती खासगी कारखानदारी व इतर...
जळगाव जिल्ह्यात कांदा बिजोत्पादन...जळगाव : जिल्ह्यात यंदा कांदा बिजोत्पादनाचे...
कलदगाव, नायगाव येथे कापूस खरेदी सुरु नांदेड  : भारतीय कपास निगमच्या (सीसीआय)...