पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार हेक्टरवर नुकसान 

​ पुणेजिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर रोजी झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे सुमारे २ हजार हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.
Of vineyards due to rains Damage to two thousand hectares
Of vineyards due to rains Damage to two thousand hectares

पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर रोजी झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे सुमारे २ हजार हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. ऐन हंगामात झालेल्या पावसामुळे मणीगळ, घडकूज आणि बुरशीच्या प्रादुर्भावाने फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. एकरी सरासरी सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. हा आकडा सुमारे १२ कोटींपर्यंत असण्याची भीती व्यक्त होत आहे. तर शासनाने १५ हजार हेक्टरवरील १९ कोटींच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.  जिल्ह्यात द्राक्ष बागांचे सुमारे २० हजार एकरवर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. यामध्ये बहुतांश क्षेत्र जुन्नर, बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यांत आहे. या तालुक्यातील द्राक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. तर अनेक द्राक्ष बागायतदारांची निर्यातीसाठीची तयारी सुरू होती, पण पावसामुळे दर्जावर परिणाम झाल्याने यंदा निर्यात कमी होण्याची शक्यता असल्याचे द्राक्ष उत्पादक संघाचे पुणे विभागीय संचालक जितेंद्र बिडवई यांनी सांगितले. 

प्रतिक्रिया 

अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने उत्पादकांना नुकसानभरपाई द्यावी. नुकसान होऊन देखील पंचनामे विलंबाने होत आहेत.  - प्रशांत सुरेश काटे, काटेवाडी (ता. बारामती) 

इंदापूर तालुक्यामध्ये नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची विभागीय कृषी सहसंचालक बवराज बिराजदार यांनी पाहणी केली आहे. तालुक्यातील ५०० हेक्टर क्षेत्राला अवकाळीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या घडातील पावसामुळे क्रॅकिंग झालेले मणी तातडीने काढून नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करावा.  -भाऊसाहेब रूपनवर, तालुका कृषी अधिकारी इंदापूर 

एक डिसेंबर रोजी जिल्ह्यात सरासरी ६४.७० मिमी पाऊस झाला असून, या पावसाने विशेषतः काढणी राहिलेल्या उभ्या भात पिकाचे, काढणीस आलेल्या तसेच नवीन कांदा लागवडीचे, भाजीपाला, पिकाचे नुकसान झाले आहे. या बाबत क्षेत्रीय स्तरावरून पंचनामे करूनच कार्यवाही सुरू आहे. अहवाल पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.  -ज्ञानेश्‍वर बोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

असे झाले प्राथमिक नुकसान  पीक --- हेक्टर  भात -- ९३.१०  नाचणी --- १०.२०  ज्वारी --- २२९८.४२  हरभरा --- ९८५.९०  कांदा --- ६८१३.७२  टोमॅटो --- ७७.३०  बटाटा --- १९९  भाजीपाला --- २४३५.२६  केळी --- ४५.५०  द्राक्ष --- २१७३.२३  इतर --- २००.२० 

३८ हजार शेतकरी बाधित  पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ५०२ गावांमधील ३८ हजार ६३३ शेतकऱ्यांचे १५ हजार ३२२ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com