Agriculture News in Marathi Of vineyards due to rains Damage to two thousand hectares | Agrowon

पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार हेक्टरवर नुकसान 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 डिसेंबर 2021

पुणे जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर रोजी झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे सुमारे २ हजार हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.

पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर रोजी झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे सुमारे २ हजार हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. ऐन हंगामात झालेल्या पावसामुळे मणीगळ, घडकूज आणि बुरशीच्या प्रादुर्भावाने फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. एकरी सरासरी सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. हा आकडा सुमारे १२ कोटींपर्यंत असण्याची भीती व्यक्त होत आहे. तर शासनाने १५ हजार हेक्टरवरील १९ कोटींच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. 

जिल्ह्यात द्राक्ष बागांचे सुमारे २० हजार एकरवर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. यामध्ये बहुतांश क्षेत्र जुन्नर, बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यांत आहे. या तालुक्यातील द्राक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. तर अनेक द्राक्ष बागायतदारांची निर्यातीसाठीची तयारी सुरू होती, पण पावसामुळे दर्जावर परिणाम झाल्याने यंदा निर्यात कमी होण्याची शक्यता असल्याचे द्राक्ष उत्पादक संघाचे पुणे विभागीय संचालक जितेंद्र बिडवई यांनी सांगितले. 

प्रतिक्रिया 

अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने उत्पादकांना नुकसानभरपाई द्यावी. नुकसान होऊन देखील पंचनामे विलंबाने होत आहेत. 
- प्रशांत सुरेश काटे, काटेवाडी (ता. बारामती) 

इंदापूर तालुक्यामध्ये नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची विभागीय कृषी सहसंचालक बवराज बिराजदार यांनी पाहणी केली आहे. तालुक्यातील ५०० हेक्टर क्षेत्राला अवकाळीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या घडातील पावसामुळे क्रॅकिंग झालेले मणी तातडीने काढून नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करावा. 
-भाऊसाहेब रूपनवर, तालुका कृषी अधिकारी इंदापूर 

एक डिसेंबर रोजी जिल्ह्यात सरासरी ६४.७० मिमी पाऊस झाला असून, या पावसाने विशेषतः काढणी राहिलेल्या उभ्या भात पिकाचे, काढणीस आलेल्या तसेच नवीन कांदा लागवडीचे, भाजीपाला, पिकाचे नुकसान झाले आहे. या बाबत क्षेत्रीय स्तरावरून पंचनामे करूनच कार्यवाही सुरू आहे. अहवाल पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
-ज्ञानेश्‍वर बोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

असे झाले प्राथमिक नुकसान 
पीक --- हेक्टर 
भात -- ९३.१० 
नाचणी --- १०.२० 
ज्वारी --- २२९८.४२ 
हरभरा --- ९८५.९० 
कांदा --- ६८१३.७२ 
टोमॅटो --- ७७.३० 
बटाटा --- १९९ 
भाजीपाला --- २४३५.२६ 
केळी --- ४५.५० 
द्राक्ष --- २१७३.२३ 
इतर --- २००.२० 

३८ हजार शेतकरी बाधित 
पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ५०२ गावांमधील ३८ हजार ६३३ शेतकऱ्यांचे १५ हजार ३२२ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. 

 


इतर बातम्या
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
युपी काँग्रेसची घोषणा : कर्जमाफी, गहू-...वृत्तसेवा - उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यास...
मराठवाड्यातील पाणीसाठा ८५ टक्‍क्‍यांवर औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमधील...
कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या...बुलडाणा : ‘‘कोरोनाची तिसरी लाट सध्या सुरू आहे. या...
ग्रामपंचायतीचे शंभर टक्के कर भरल्यास...पुणे : थकीत कर वसुलीसाठी मावळ तालुक्यातील घोणशेत...
अमरावती : पोलिस अधिकाऱ्याच्या...अमरावती ः भारतीय पोलिस सेवेत असलेल्या एका युवा...
पंढरपुरातील विकासकामे दर्जेदार व्हावीत...सोलापूर ः पंढरपुरात वारीनिमित्त लाखो भाविक येतात...
अमरावती विभागात १५ हजार हेक्‍टर पिकांचे...अमरावती ः खरिपानंतर रब्बी हंगामातील पिकांनादेखील...
कोल्हापुरातील १६, तर सांगलीतील चार...कोल्हापूर : कृषी ग्राहकांची चालू व थकीत...
जळगावमधील १७५ गावांमध्ये पाणी योजना...जळगाव : जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणीप्रश्‍न...
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...