नाशिकमधील १०० शाळांमध्ये होणार ‘व्हर्च्युअल क्लासरूम’

नाशिकमधील १०० शाळांमध्ये होणार ‘व्हर्च्युअल क्लासरूम’
नाशिकमधील १०० शाळांमध्ये होणार ‘व्हर्च्युअल क्लासरूम’

नाशिक : जिल्हा परिषदेच्या १०० शाळांमध्ये सीएसआर फंडातून ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी गुरुवारी (ता. १) दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या उपक्रमाचे प्रात्यक्षिक त्यांच्यासमोर सादर केले.

व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनीदेखील या उपक्रमाचे कौतुक करून मदत करण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १०० शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या उपक्रमाची अंमलबजावणी होईल. यासाठी चार कोटी रुपयांपर्यंतचा निधी सामाजिक बांधिलकी (सीएसआर)तून जमा करण्यात येईल. निवडलेल्या शाळांना व्हर्च्युअल क्लासरूमसाठी संगणक, एलईडी देण्यात येतील.

 नाशिकच्या केंद्रातून एकाचवेळी विविध तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी विविध सामाजिक व सेवाभावी संस्था, जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व तज्ज्ञ शिक्षकांचा सहभाग घेण्यात येईल, असे सांगळे यांनी सांगितले. सांगळे यांनी खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, युवानेते उदय सांगळे यांच्या समवेत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. मोदी यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देतानाच नाशिक जिल्ह्याने यशस्वीपणे अंमलबजावणी केल्यास महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हा उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. 

शहर व गावांतील दरी कमी करण्यासाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूमचा प्रयोग नक्कीच उपयुक्त ठरेल. हा उपक्रम जिल्ह्यात पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न आहे, असे सांगळे यांनी नमूद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com