व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढणार ः तोमर 

व्हर्च्युअल क्लासरूम आणि अॅग्री-दीक्षा वेब एज्युकेशन चॅनेलमुळे कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढणार आहे. देशातील आणि परदेशातील कृषी शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांचे व्याख्यान देशभरातील कृषी पदवीधरांना एकाच प्लॉटफॉर्मवर बघता येणार आहे.
Virtual classrooms will enhance quality of agricultural education: Tomar
Virtual classrooms will enhance quality of agricultural education: Tomar

नगर ः व्हर्च्युअल क्लासरूम आणि अॅग्री-दीक्षा वेब एज्युकेशन चॅनेलमुळे कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढणार आहे. देशातील आणि परदेशातील कृषी शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांचे व्याख्यान देशभरातील कृषी पदवीधरांना एकाच प्लॉटफॉर्मवर बघता येणार आहे. हे व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे कोरोनाच्या या आपत्तीचे ईष्ट आपत्तीमध्ये आपण रूपांतर केले आहे, असे केंद्रिय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.  

भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली आणि जागतिक बँक अर्थसाह्यित राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातीस १८ कृषी विद्यापीठे आणि भारतीय कृषी संशोधन अंतर्गत संस्थांना व्हर्च्युअल क्लासरूम देण्यात आल्या आहे. या व्हर्च्युअल क्लासरूमचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. नलाइन झालेल्या कार्यक्रमात कृषी राज्य मंत्री पुरुषोत्तम रुपाला, भारत सरकारच्या कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे सचिव (डेअर) व भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्र, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सचिव संजय कुमार सिंह, उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. आर. सी. अग्रवाल, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रभात कुमार, डॉ. राजेंद्र प्रसाद, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे सहभागी झाले होते. 

नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, ‘‘भारत हा कृषी प्रधान देश असून, कृषी क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या कृषी क्षेत्राचा आधार शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ आहे. कृषी पदवीधरांनी कृषी उद्योजक व्हावे. कृषीच्या ज्ञानाचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करावा आणि कृषीमधील नवनवीन संकल्पना घेऊन संशोधन करावे. कोरोना परिस्थितीमध्ये सुद्धा ऑनलाइन प्रणालीमुळे शिक्षण थांबलेले नाही. आजकालचे विद्यार्थी भाग्यशाली आहे कारण त्यांना अद्ययावत ऑनलाइन शिक्षण प्रणालीतून शिक्षण मिळत आहे. या विद्यार्थ्यांनी व्हर्च्युअल क्लासरूमचा जास्तीत जास्त फायदा करुन घ्यावा.’’ या ऑनलाइन कार्यक्रमाची व्यवस्था व्हर्च्युअल क्लासरूमचे नोडल अधिकारी डॉ. एम. आर. पाटील यांनी केली. या ऑनलाइन कार्यक्रमासाठी देशभरातील विविध कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, संचालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आभार मानले. 

विद्यापीठात व्हर्च्युअल क्लासरूम  राज्यात फक्त राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये हे व्हर्च्युअल क्लासरूम देण्यात आलेले आहे. या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये जे व्याख्यान घेतले जाते ते एकाच वेळेस वेबकास्ट करून भारतात सर्व ठिकाणी बघणे शक्य होते. या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये घेतेलेले लेक्चर अॅग्री-दीक्षा वेब इज्युकेशन चॅनेलवर केव्हाही बघणे शक्य होणार आहे, असे कृषी विद्यापीठातून सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com