Agriculture news in marathi Virtual classrooms will enhance quality of agricultural education: Tomar | Agrowon

व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढणार ः तोमर 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 एप्रिल 2021

व्हर्च्युअल क्लासरूम आणि अॅग्री-दीक्षा वेब एज्युकेशन चॅनेलमुळे कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढणार आहे. देशातील आणि परदेशातील कृषी शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांचे व्याख्यान देशभरातील कृषी पदवीधरांना एकाच प्लॉटफॉर्मवर बघता येणार आहे.

नगर ः व्हर्च्युअल क्लासरूम आणि अॅग्री-दीक्षा वेब एज्युकेशन चॅनेलमुळे कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढणार आहे. देशातील आणि परदेशातील कृषी शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांचे व्याख्यान देशभरातील कृषी पदवीधरांना एकाच प्लॉटफॉर्मवर बघता येणार आहे. हे व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे कोरोनाच्या या आपत्तीचे ईष्ट आपत्तीमध्ये आपण रूपांतर केले आहे, असे केंद्रिय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. 

भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली आणि जागतिक बँक अर्थसाह्यित राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातीस १८ कृषी विद्यापीठे आणि भारतीय कृषी संशोधन अंतर्गत संस्थांना व्हर्च्युअल क्लासरूम देण्यात आल्या आहे. या व्हर्च्युअल क्लासरूमचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. नलाइन झालेल्या कार्यक्रमात कृषी राज्य मंत्री पुरुषोत्तम रुपाला, भारत सरकारच्या कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे सचिव (डेअर) व भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्र, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सचिव संजय कुमार सिंह, उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. आर. सी. अग्रवाल, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रभात कुमार, डॉ. राजेंद्र प्रसाद, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे सहभागी झाले होते. 

नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, ‘‘भारत हा कृषी प्रधान देश असून, कृषी क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या कृषी क्षेत्राचा आधार शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ आहे. कृषी पदवीधरांनी कृषी उद्योजक व्हावे. कृषीच्या ज्ञानाचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करावा आणि कृषीमधील नवनवीन संकल्पना घेऊन संशोधन करावे. कोरोना परिस्थितीमध्ये सुद्धा ऑनलाइन प्रणालीमुळे शिक्षण थांबलेले नाही. आजकालचे विद्यार्थी भाग्यशाली आहे कारण त्यांना अद्ययावत ऑनलाइन शिक्षण प्रणालीतून शिक्षण मिळत आहे. या विद्यार्थ्यांनी व्हर्च्युअल क्लासरूमचा जास्तीत जास्त फायदा करुन घ्यावा.’’ या ऑनलाइन कार्यक्रमाची व्यवस्था व्हर्च्युअल क्लासरूमचे नोडल अधिकारी डॉ. एम. आर. पाटील यांनी केली. या ऑनलाइन कार्यक्रमासाठी देशभरातील विविध कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, संचालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आभार मानले. 

विद्यापीठात व्हर्च्युअल क्लासरूम 
राज्यात फक्त राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये हे व्हर्च्युअल क्लासरूम देण्यात आलेले आहे. या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये जे व्याख्यान घेतले जाते ते एकाच वेळेस वेबकास्ट करून भारतात सर्व ठिकाणी बघणे शक्य होते. या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये घेतेलेले लेक्चर अॅग्री-दीक्षा वेब इज्युकेशन चॅनेलवर केव्हाही बघणे शक्य होणार आहे, असे कृषी विद्यापीठातून सांगण्यात आले. 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...