नगर : साडेतीनशे हेक्टरवरील टोमॅटोला विषाणूजन्य रोगाची बाधा 

टोमॅटो पिकावर तीन विषाषूजन्य रोगाच्या प्रादुर्भाव झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर तालुक्यातील सुमारे पन्नासपेक्षा अधिक गावांतील साडेतानशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील टोमॅटो पीकाला बाधा झाली आहे.
tomato
tomato

नगरः टोमॅटो पिकावर तीन विषाषूजन्य रोगाच्या प्रादुर्भाव झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर तालुक्यातील सुमारे पन्नासपेक्षा अधिक गावांतील साडेतानशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील टोमॅटो पीकाला बाधा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट तर वाया गेलेच, पण उत्पादन खर्चापोटीचे सुमारे पंधरा कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.  बाधीत क्षेत्राचा आणि नुकसानीचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत सुमारे सव्वा सहाशे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे नुकसान झाल्याबाबत लेखी तक्रार केली आहे. नुकसानीचे कारण निष्पन्न झाल्यानंतर नुकसान भरपाई किंवा अन्य पुढील प्रक्रिया होणार आहे.  अकोले, संगममेर तालुक्यातील बहूतांश गावांत टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. दोन्ही तालुक्यात टोमॅटो लागवडीचे क्षेत्र साधारण आडीच हजार हेक्टर असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक शेतकऱ्यांनी टोमटोची लागवड केली. त्यानंतर अगदी उत्पादन हाती येईपर्यंत टोमॅटोचे पीक जोमदार होते. प्रत्यक्ष फळ हाती आल्यानंतर मात्र फळांत सदोषपणा दिसून आला. फळांचा रंग बदललेला दिसला तर त्यातील कडकपणाही झाडाला असतानाच नाहीसा होतोय. फळांचा आतील भागाचाही रंग बदल होत आहे. त्यामुळे बाजारात या टोमॅटोला मागणी नसल्याचा अनेक शेतकऱ्यांना अनुभव आला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून टोमॅटोचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्यांदाच असा अनुभव आला आहे. तीन विषाणुजन्य रोगाची टोमॅटोला बाधा झाली आहे. या विषाणुजन्य ब्राऊन रुगोस या रोगाबाबत अजून पुरावे नाहीत.  विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव थेट टोमॅटोच्या फळावर होत असल्याने अकोले, संगमनेरात सुमारे साडेतीनशे हेक्टर क्षेत्राला बाधा झाली असून पिकांचे ९० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पन्न तर निघाले नाहीच, पण उत्पादन खर्चापोटी सुमारे पंधरा कोटीपेक्षा अधिक फटका बसला आहे. अकोल्यातील ३०२ तर संगमनेरातील साधारण सव्वातीनशे शेतकऱ्यांनी याबाबत कृषी विभागाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत.  कृषी विद्यापीठाकडून पाहणी  टोमॅटोवर विषाणुजन्य रोगामुळे झालेल्या नुकसानीची चार दिवसांपुर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील वनस्पती रोग शास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. कोळसे, डॉ. विवेक शिंदे, भाजीपाला संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. भालेकर, डॉ. अनिकेत चंदनशिवे, किटक शास्त्रज्ञ विभागाचे डॉ. एस. व्ही. पवार, कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या पथकाने टोमॅटो पिकांच्या लागवड बियाणांनुसार दोन्ही तालुक्यात ३४ लॉटमधील नुकसानीची पाहणी केली. सोमवारी प्रत्येक लॉटनुसार ३४ नमुने तपासणीसाठी बंगळूरूला पाठवली जाणार आहेत.  प्रतिक्रिया काढणीला आलेल्या टोमॅटो पीकांचे नुकसान होत आहे. त्याबाबत शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारी दाखल असून कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या पथकाने पाहणी केली आहे. तपासणीसाठी टोमॅटोचे नमुने बंगळूरूला पाठवले जाणार आहेत. अहवाल आल्यानंतरच पुढील बाबी ठरवल्या जातील.  - सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी, संगमनेर जि. नगर  अकोले, संगमनेरमधील स्थिती  एकूण टोमॅटो लागवड क्षेत्रः २५०० (सरासरी)  रोगामुळे बाधीत क्षेत्रः ३५० हेक्टर  उत्पादनाचे सरासरी नुकसानः ९० टक्के  आर्थिक फटकाः सुमारे १५ कोटी (हेक्टरी सरासरी चार लाख)  शेतकऱ्यांनी केल्या लेखी तक्रारीः ६२५  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com