agriculture news in Marathi Virus on moong and urad in Ausa taluka Maharashtra | Agrowon

औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या तडाख्यात 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके ‘यलो मोझॅक व्हायरस’ रोगाच्या तडाख्यात सापडले आहेत. झाडासह लागलेल्या शेंगाही पिवळ्या पडत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके ‘यलो मोझॅक व्हायरस’ रोगाच्या तडाख्यात सापडले आहेत. झाडासह लागलेल्या शेंगाही पिवळ्या पडत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. झपाट्याने वाढत चाललेल्या या रोगामुळे चार दिवसांत पूर्ण प्लॉट पिवळा होऊन करपून जात आहे. 

तालुक्यात यंदा पाऊस जरी जास्त नसला तरी पिकापुरता पाऊस पडला. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग ही पिके जोमदार आली. जास्त मेहनत न करताही ही पिके तीन फूट उंच झाली. त्याला फुले आणि शेंगाही भरघोस लागल्या. मात्र आता हे पीक शेंगा अवस्थेत असताना अचानक झाडे पिवळी पडून सुकून जात आहेत. संपूर्ण प्लॉटमध्ये आज एखाद दुसरे झाड पिवळे दिसले तर दोन दिवसांत अनेक झाडे पिवळी दिसत आहेत. नुसती झाडेच पिवळी पडत नाहीत तर त्याला लागलेल्या शेंगाही पिवळ्या पडून गळून जात आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक करपून जात आहेत. 

योग्य निदान न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च अंगलट येत असल्याचे चित्र आहे. बऱ्याच ठिकाणी उडीद मुगावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याच्या प्रादुर्भावामुळे पिके निस्तेज बनत आहेत. 

कमी फुले आणि शेंगा 
सुरुवातीला कोवळ्या पानांवर सौम्य विखुरलेले पिवळ्या रंगाचे डाग दिसतात. डाग हळूहळू आकारात वाढतात आणि शेवटी काही पाने पूर्णपणे पिवळी होतात. संक्रमित पाने देखील ‘नेक्रॉसीस’ची लक्षणे दर्शवितात. रोगग्रस्त झाडे उधळली जातात, उशिरा प्रौढ होतात आणि फारच कमी फुले व शेंगा तयार करतात. फळ आकाराने कमी केले जातात आणि पिवळ्या रंगाचे होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

प्रतिक्रिया
रस शोषणाऱ्या किडीमुळे रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी डायमेथोएट तीन मिली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. 
- संदीप देशमुख, शास्त्रज्ञ, मांजरा कृषी विज्ञान केंद्र 
 


इतर ताज्या घडामोडी
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...