Agriculture news in marathi Visarga from ‘Songir Jamphal’ | Agrowon

‘सोनगीर जामफळ’मधून विसर्ग

टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

सोनगीर,  जि. धुळे  ः तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ व कनोली प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे.

सोनगीर,  जि. धुळे  ः तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ व कनोली प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. पावसाने मूळ धरण शंभर टक्के भरले असून स्त्रोत सुरूच आहेत. त्यामुळे पाटचारीतून पाणी सोडण्यात आले आहे.

मूळ धरणाची उंची २७ मीटर आहे. २५ मीटरपर्यंत पाणी पोहचले. दरम्यान धरणात दहा लक्ष घनफुटाचे सहा मोठे खड्डे खोदण्यात आले. त्यामुळे पाणी धरणाच्या बांधावरून जाऊ शकत नाही. परंतु, प्रकल्प कामात वाढीव पाण्याचा अडथळा नको म्हणून हे पाणी सोडले जात आहे.

तीन वर्षांत धरणाचे काम पूर्ण होईल. धरणग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने शेती अधिग्रहणाअभावी पूर्वेकडील काम बंद आहे. तिकडे पाणी जाऊ नये म्हणूनही पाणी सोडण्यात आले. धरणाचे तीस टक्के काम पूर्णही झाले आहे. दरम्यान, धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडले. शिवारातील चैतन्यवन तसेच सोनगीर दोंडाईचा राज्य मार्गावर जाऊ नये म्हणून धरणाची उंची दोन मीटरने कमी करण्यात येत आहे.

सुलवाडे- जामफळ -कनोली उपसा सिंचन ही अन्य योजनांपेक्षा वेगळी असून तिला पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून मंजुरी मिळाली. चार वर्षांत योजना पूर्ण करणे बंधनकारक आहे. योजनेमुळे धुळे व शिंदखेडा तालुक्यातील प्रथम प्रत्येकी पन्नास व पुढे आणखी शंभर अशी दोनशे गावे सिंचनाखाली येतील. तापी नदीचे समुद्रात वाया जाणारे पाणी १२ फूट व्यासाच्या दोन जलवाहिनीतून जामफळमध्ये टाकून तेथून परिसरातील पाच ते सहा व अन्य नऊ लहान मोठी धरणे भरली जातील.

पाटचारीतून दहा सेंटिमीटर पाणी

गतवर्षी चांगला पाऊस पडला. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले होते. उन्हाळ्यात देखील ७० टक्के धरण भरले होते. यंदाही धरण परिसरात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने धरण भरले. त्यांपैकी दहा सेंटिमीटर उंचीइतके पाणी पाटचारीतून सोडण्यात येत आहे. ते पाणी लिमळी नदी पात्रातून सार्वे, पिंपरखेडा, गोराणे, नरडाणा पुढे तापी पर्यत जाईल. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे सांगण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...