‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२ दरवाजांतून विसर्ग सुरू

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२) हलका ते जोरदार पाऊस झाला. कळमनुरी मंडलात अतिवृष्टी झाली. पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.
Visarga from 10 doors of 'Yeldari' and 12 doors of 'Siddheshwar'
Visarga from 10 doors of 'Yeldari' and 12 doors of 'Siddheshwar'

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२) हलका ते जोरदार पाऊस झाला. कळमनुरी मंडलात अतिवृष्टी झाली. पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे येलदरी धरणाच्या १० आणि सिद्धेश्‍वर धरणाच्या १२ दरवाजांद्वारे विसर्ग सुरू होता. निम्न दुधना प्रकल्पातून विसर्ग कमी करण्यात आला. दोन दरवाजांद्वारे विसर्ग सुरू होता. सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील हाती आलेला घास निसर्गाकडून हिरावला जाण्याची भीती आहे.

परभणी जिल्ह्यातील ५२ मंडलांमध्ये सरासरी १६.४ मिमी पाऊस झाला. परभणी, सेलू, मानवत तालुक्यांतील अनेक मंडलांत जोरदार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर येवा सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.२१) रात्रीपासून येलदरी धरणाच्या सर्व १० दरावाजांद्वारे २१ हजार ९८ हजार क्युसेक, तसेच जलविद्युत केंद्रातून २ हजार  ७०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला.

हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांत सरासरी १०.९ मिमी पाऊस झाला. कळमनुरी मंडलात अतिवृष्टी झाली. येलदरी धरणातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे त्याखालील सिद्धेश्‍वर धरणाच्या १२ दरवाजांद्वारे ६ दरवाजे तीन फुटांनी आणि ६ दरवाजे २ फुटांनी उघडून नदी पात्रात २१ हजार ८४० क्युसेकने, तसेच सांडव्यावरून २ हजार ७५१ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. विसर्ग कमी अधिक करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठाच्या गावातील नागरिक, शेतकऱ्यांनी सतर्क राहावे.

 मंडलनिहाय पाऊस (१५ मिमीच्या पुढे)

परभणी जिल्हा ः परभणी ३७.५, परभणी ग्रामीण ३५.८, पेडगाव ४९, जांब १६, झरी २५.३, सिंगणापूर १६.३, टाकळी कुंभकर्ण ३२.३,बोरी २२.८, वाघी धानोरा १९, दूधगाव २४.५, सेलू २८.५, देऊळगाव गात २१.५, वालूर २०.३, केकरजवळा १७.८, ताडबोरगाव १९, पाथरी १७.५, बाभळगाव २४.३, हादगाव १७, कासापुरी २४.८, शेळगाव २०.३, महातपुरी ३०, पालम १९.८, रावराजूर २७.३, पूर्णा १८,कात्नेश्‍वर १८.५, कावलगाव १७.५. हिंगोली जिल्हा ः हिंगोली २२.३, बासंबा २६.५, खंबाळा ३०.३, कळमनुरी ७०, नांदापूर १८, हट्टा १६.८.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com