Agriculture news in marathi Visarga from 10 doors of 'Yeldari' and 12 doors of 'Siddheshwar' | Page 2 ||| Agrowon

‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२ दरवाजांतून विसर्ग सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 सप्टेंबर 2021

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२) हलका ते जोरदार पाऊस झाला. कळमनुरी मंडलात अतिवृष्टी झाली. पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२) हलका ते जोरदार पाऊस झाला. कळमनुरी मंडलात अतिवृष्टी झाली. पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे येलदरी धरणाच्या १० आणि सिद्धेश्‍वर धरणाच्या १२ दरवाजांद्वारे विसर्ग सुरू होता. निम्न दुधना प्रकल्पातून विसर्ग कमी करण्यात आला. दोन दरवाजांद्वारे विसर्ग सुरू होता. सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील हाती आलेला घास निसर्गाकडून हिरावला जाण्याची भीती आहे.

परभणी जिल्ह्यातील ५२ मंडलांमध्ये सरासरी १६.४ मिमी पाऊस झाला. परभणी, सेलू, मानवत तालुक्यांतील अनेक मंडलांत जोरदार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर येवा सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.२१) रात्रीपासून येलदरी धरणाच्या सर्व १० दरावाजांद्वारे २१ हजार ९८ हजार क्युसेक, तसेच जलविद्युत केंद्रातून २ हजार  ७०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला.

हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांत सरासरी १०.९ मिमी पाऊस झाला. कळमनुरी मंडलात अतिवृष्टी झाली. येलदरी धरणातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे त्याखालील सिद्धेश्‍वर धरणाच्या १२ दरवाजांद्वारे ६ दरवाजे तीन फुटांनी आणि ६ दरवाजे २ फुटांनी उघडून नदी पात्रात २१ हजार ८४० क्युसेकने, तसेच सांडव्यावरून २ हजार ७५१ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. विसर्ग कमी अधिक करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठाच्या गावातील नागरिक, शेतकऱ्यांनी सतर्क राहावे.

 मंडलनिहाय पाऊस (१५ मिमीच्या पुढे)

परभणी जिल्हा ः परभणी ३७.५, परभणी ग्रामीण ३५.८, पेडगाव ४९, जांब १६, झरी २५.३, सिंगणापूर १६.३, टाकळी कुंभकर्ण ३२.३,बोरी २२.८, वाघी धानोरा १९, दूधगाव २४.५, सेलू २८.५, देऊळगाव गात २१.५, वालूर २०.३, केकरजवळा १७.८, ताडबोरगाव १९, पाथरी १७.५, बाभळगाव २४.३, हादगाव १७, कासापुरी २४.८, शेळगाव २०.३, महातपुरी ३०, पालम १९.८, रावराजूर २७.३, पूर्णा १८,कात्नेश्‍वर १८.५, कावलगाव १७.५.
हिंगोली जिल्हा ः हिंगोली २२.३, बासंबा २६.५, खंबाळा ३०.३, कळमनुरी ७०, नांदापूर १८, हट्टा १६.८.
 


इतर बातम्या
कोदामेंढीत विषाणूजन्य रोगामुळे मिरची...कोदामेंढी, नागपूर  : वातावरणातील बदलामुळे...
बीडमध्ये किसान सभेने जाणल्या...बीडमध्ये : किसान सभेच्या ‘शेतकऱ्यांची दिवाळी...
वऱ्हाडात हरभऱ्याच्या लागवडीला आला वेगअकोला ः रब्बी हंगामासाठी पोषक परिस्‍थिती आहे....
शिरूर तालुक्यात वीजजोड तोडल्याने पिके...पुणे : महावितरणने वीजबिल वसुलीसाठी वीजजोड...
परभणी विभागात उन्हाळी हंगामात सोयाबीनचे...परभणी ः  ‘महाबीज’च्या परभणी विभागातील परभणी...
रत्नागिरीत अवकाळी पावसाने मोडले कंबरडेसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर...
परभणी जिल्ह्यात शेतीमाल तारणावर १ कोटी...परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत...
वीजबिल वसुलीविरोधात अकोटमध्ये आंदोलनअकोला ः थकीत वीजबिल वसुलीसाठी एकीकडे महावितरणकडून...
आजऱ्यात चिखलातच भातकापणी आजरा, जि. कोल्हापूर ः ढगाळ वातावरण तालुक्यात कायम...
पारोळ्यात वृक्ष लागवड योजना पुन्हा सुरू...पारोळा, जि. जळगाव : तालुक्यात मागील काही...
कळसमध्ये वीजबिल वसुलीविरोधात...कळसमध्ये, जि. पुणे ः कृषिपंपांची वीजबिल वसुली...
‘स्वच्छ सर्वेक्षण अभियानात ...सोलापूर ः ‘‘जिल्ह्यातील स्वच्छतेचे गुणांकन...
शासकीय कृषी तंत्रनिकेतन पदविका प्रवेशास...नाशिक : राज्य शासनाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ...
पीक पाहणीस विमा कंपनीचे प्रतिनिधी...वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी: तालुक्यात अतिवृष्टी व...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोकण, मध्य...
उडीद, मुगाच्या उत्पादनात घट नांदेड : जिल्ह्यातील मूग, उडीद या खरिपातील...
कृषी कायद्यांच्या माघारीवर  कॅबिनेट...नवी दिल्ली : वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनापुढे...
राज्यात गायीच्या दुधाच्या  खरेदीदरात...पुणे ः राज्यातील खासगी डेअरीचालकांना गायीच्या...
खेडा खरेदीमुळे दारव्हा  बाजार समिती...यवतमाळ ः दारव्हा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आपल्या...
सोलापूर ः रब्बी हंगामातील प्रमुख...सोलापूर ः शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा बेसुमार व...