Agriculture News in Marathi Visarga closed from dams in Pune | Agrowon

पुण्यातील धरणांतून विसर्ग बंद

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

परतीचा पाऊस राज्यातून परतल्याने पावसाने उघडीप दिली आहे. धरणांत पाण्याची आवक कमी होत आहे. सध्या अवघ्या दोन धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून, इतर धरणांतून मागील काही दिवसांपासून सोडण्यात आलेला विसर्ग आता बंद करण्यात आला आहे.

पुणे : परतीचा पाऊस राज्यातून परतल्याने पावसाने उघडीप दिली आहे. धरणांत पाण्याची आवक कमी होत आहे. सध्या अवघ्या दोन धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून, इतर धरणांतून मागील काही दिवसांपासून सोडण्यात आलेला विसर्ग आता बंद करण्यात आला आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून, पाणीटंचाई कमी भासण्याचा अंदाज जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.
 
  चालू वर्षी मॉन्सून दाखल झाल्यानंतर पावसाने चांगलीच सुरूवात केली होती. जून महिन्यात कमी पाऊस झाला असला तरी जुलै महिन्यात झालेल्या पावसाने धरणातील पाणी पातळीत चांगली वाढ झाली होती. ऑगस्ट महिन्यात पुन्हा काही प्रमाणात ओढ दिली होती. त्यामुळे धरणे भरतील की नाही याची चिंता लागून होती. परंतु सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसाने ही धरणे शंभर टक्के भरली. प्रामुख्याने घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने नद्या, नाले खळाळून वाहिल्याने धरणे भरण्यास मदत झाली आहे.

सध्या जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे तुंडूब भरली असून, पाण्याच्या विसर्गात घट केली आहे. जिल्ह्यात जवळपास २६ धरणे आहेत. त्यापैकी १९ धरणे ही शंभर टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरू होता. उर्वरित धरणांत ८० टक्क्यांजवळ पाणीसाठा झाला आहे. यंदा शेवटच्या टप्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती. त्यामुळे खडकवासला, वडज, चासकमान, पवना, वरसगाव, पानशेत, वीर, उजनी, डिंभे, घोड, आंध्रा, भामा आसखेड, कळमोडी अशा धरणांतून सांडव्याला पाणी सोडण्यात आले होते.

 धरणनिहाय असलेला उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी) 
पिंपळगाव जोगे ३.०२, माणिकडोह ६.८४, येडगाव १.६३, वडज १.१७, डिंभे १२.४९, घोड ४.८७, विसापूर ०.६३, कळमोडी १.५१, चासकमान ७.५७, भामा आसखेड ७.६७, वडिवळे १.०७, आंध्रा २.९२, पवना ८.५१, मुळशी १७.६९, टेमघर ३.७१, वरसगाव १२.८२, पानशेत १०.६५, खडकवासला १.४१, गुंजवणी ३.६९, नीरा देवधर ११.७३, भाटघर २३.५०, वीर ९.४१, नाझरे ६.४९, उजनी ५३.५७, चिल्हेवाडी ०.८०.


इतर बातम्या
सोयापेंड आयातीचा प्रस्ताव नाहीपुणे ः पोल्ट्री उद्योगाने सोयापेंड आयातीसाठी...
सरसेनाध्यक्ष हेलिकॉप्टर अपघातामध्ये...नवी दिल्ली ः तमिळनाडूमध्ये लष्करी हेलिकाॅप्टरला...
सोयाबीन हेक्टरी पिकले बारा क्विंटल ३५...लातूर : पीक कापणी प्रयोगाअंती लातूर जिल्ह्यात...
‘पशुसंवर्धन’च्या लाभासाठी मराठवाड्यातून...औरंगाबाद : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध लाभाच्या...
मंजूर रस्त्यांच्या कामांना ...अकोला ः जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २५...
बंधारे ढीगभर, तरीही पाणीटंचाई शिगेला नागपूर : नरखेड तालुक्यात अनेक ठिकाणी छोटी-मोठी...
पीकविमा जाहीर झाला, पैसै कधी मिळणार? नगर ः नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भरलेला गत वर्षीचा...
‘नाफेड’साठी खरेदी केलेला कांदा चाळीतच...नाशिक : केंद्राच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत ‘...
सातारा जिल्ह्यात पावसाचा १५ हजार...सातारा : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या...
शेतकरी संघटनेचा ठिय्या;  ३५...अकोला ः पातूर तालुक्यातील सस्ती परिसरातील...
पीक आमचं, भावही आम्हीच निश्‍चित करू : ...कोंढाळी, जि. नागपूर : आता पीक आमचे आणि त्याचा...
पुणे जिल्हा बँकेसाठी १५९ अर्ज पात्रपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होत असतानाच,...
देशात नवा खत कायदा आणण्याच्या हालचालीपुणे ः देशासाठी स्वतंत्र खत कायदा तयार करण्याच्या...
शेवग्याला दराची झळाळीकोल्हापूर : राज्यात नुकत्याच झालेल्या...
पीक कापणी प्रयोग  ‘महाडीबीटी’वर कृषी...नागपूर : पीक कापणी प्रयोगाच्या तक्त्यांची संख्या...
बायो-सीएनजी गॅसवर ट्रॅक्टर चालविण्याचा...माळेगाव, जि. पुणे ः शेती आणि शेतीपूरक व्यवसाय...
बायोसिरप तंत्रामुळे इथेनॉल उद्योगाचे...पुणे ः उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करता येते;...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या...
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...नांदेड : जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना...