Agriculture news in marathi Visarga increased by 30,000 cusecs from Ujani to Bhima | Agrowon

`उजनी`तून `भीमा`त ३० हजार क्‍युसेकने विसर्ग वाढला

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

सोलापूर : उजनी धरणामध्ये वरच्या धरणातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कायम आहे. त्यामुळे उजनीतील पाणी पातळी वाढत आहे. 

सोलापूर : उजनी धरणामध्ये वरच्या धरणातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कायम आहे. त्यामुळे उजनीतील पाणी पातळी वाढत आहे. परिणामी, पाणीपातळी स्थिर रहावी, यासाठी उजनीतून भीमानदीत पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून १० ते १५ हजार क्‍युसेकपर्यंत असणारा विसर्ग मंगळवारी (ता.१५) तब्बल ३० हजार क्‍युसेकपर्यंत वाढवण्यात आला. 

गेल्या आठवड्यापासून धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. आधी ५ हजार, नंतर १० हजार, त्यानंतर २० हजार क्‍युसेक विसर्ग नदीत सोडला. आता मंगळवारी तो ३० हजार क्‍युसेकपर्यंत वाढवण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

भीमा नदीतील ३० हजार क्‍युसेक विसर्गासह मुख्य कालव्यात २३०० क्‍युसेक, सीना-माढा प्रकल्पासाठी २५९ क्‍युसेक, वीजनिर्मितीसाठी १६०० क्‍युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. धरणाच्या ४१ दरवाजांपैकी १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत.  

भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहेच. पण, पुढे संगम येथेही नीरेकडून भीमेमध्ये १३ हजार ८७० क्‍युसेक इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे भीमा नदीत जवळपास ४३ हजार ८७० क्‍युसेक इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. परिणामी, पंढरपूरपासून पुढे नदीमध्ये पुराचा धोका वाढला आहे. त्यासाठी नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मंगळवारी धरणातील पाणी  

एकूण पाणी पातळी ४९७.३२० मीटर
एकूण पाणी साठा १२३.१५ टीएमसी
उपयुक्त पाणी साठा ५९.५० टीएमसी
टक्केवारी ११.०५ टक्के

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...