Agriculture news in marathi Visarga through the ten doors of ‘Yeldari’ | Agrowon

‘येलदरी’च्या दहा दरवाजातून विसर्ग

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

परभणी : येलदरी धरणातील विसर्गामुळे त्याखालील सिध्देश्वर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्यामुळे दहा दरवाजे उघडून नदी पात्रात विसर्ग सुरु करण्यात आला.

परभणी : येलदरी धरणातील विसर्गामुळे त्याखालील सिध्देश्वर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्यामुळे दहा दरवाजे उघडून नदी पात्रात विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे पूर्णा नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

परभणी, हिंगोली जिल्ह्याच्या सिमेवरुन वाहणाऱ्या पूर्णा नदीवरील येलदरी प्रकल्पात पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सोमवारी (ता.१४) धरणाचे सर्व दहा दरवाजे उघडून नदी पात्रात विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे मंगळवारी (ता.१५) सकाळी देखील धरणातून विसर्ग सुरुच होता.

येलदरी प्रकल्पाच्या जलशयामध्ये मंगळवारी (ता.१५) सकाळी आठ वाजता ८०९.७७० एमएमक्युब (१०० टक्के) उपयुक्त पाणी होते. धरणाच्या उर्ध्व भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने, तर सहा दरवाजे एक मीटरने वर उचलून नदी पात्रात २९ हजार ४८० क्युसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला.

जलविद्युत निर्मिती केंद्रांव्दारे २ हजार ५०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरु आहे. दोन्हीतून ३१ हजार ९८० क्युसेक वेगाने विसर्ग सुरु होता. येलदरी धरणाच्या क्षेत्रात यंदा एक जूनपासून आजवर ७४६ मि.मी पाऊस झाला आहे. धरणात गेल्या २४ तासांमध्ये ६४.१५७ एमएमक्युब, तर आजवर एकूण ११५३.०९६ एमएमक्युब पाण्याची आवक झाली. आजवर एकूण १६.७९६ एमकेडब्लूएच वीज निर्मिती झाली आहे.

येलदरी धरणाच्या खालच्या भागातील सिध्देश्वर धरण १०० टक्के भरले आहे. येलदरी धरणातील विसर्गामुळे पाण्याची आवक वाढली. त्यामुळे या धरणाचे दहा दरवाजे उघडून नदी पात्रात ३२ हजार ३२ क्युसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला.

यंदा ही दोन्ही ऑगस्ट महिन्यातच शंभर टक्के भरली आहेत. नदीपात्रात विसर्ग सुरु असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...