येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्ग

परभणी : येलदरी (जि. परभणी) धरण भरले आहे. बुधवारी (ता.१२) सायंकाळी दोन दरवाजे ५ सेमींनी वर उचलण्यात आले. नदी पात्रात ४ हजार २१९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.
 Visarga through the two doors of Yeldari
Visarga through the two doors of Yeldari

परभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील विसर्गामुळे पाण्याची आवक वाढली. त्यामुळे येलदरी (जि. परभणी) धरण भरले आहे. बुधवारी (ता.१२) सायंकाळी दोन दरवाजे ५ सेमींनी वर उचलण्यात आले. नदी पात्रात ४ हजार २१९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. 

दरम्यान, या धरणातील उपयुक्त पाणी बुधवारी (ता.१२) सकाळी ७८४.९४६ एमएमक्युब ( ९६.९३ टक्के ) पर्यंत पोचले. त्यामुळे जलविद्युत केंद्रातून वीज निर्मिती सुरु करण्यात आली असल्याची माहिती पूर्णा पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. 

सोमवार (ता.१०) पासून खडकपूर्णा धरणाचे नऊ वक्री दरवाजे ३० सेमीने वर उचलून नदी पात्रात १३ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे येलदरी धरणाच्या जलयाशयातील पाण्याच्या आवकेत वाढ झाली. बुधवारी (ता.१२)सकाळी खडकपूर्णा धरणाच्या दरवाज्याव्दारे नदीपात्रात १० हजार ६५० क्युसेकने विसर्ग सुरु होता. त्यामुळे येलदरी धरणातील एकूण पाणीपातळीत ९०९.६० एमएमक्युबपर्यंत वाढ झाली.

एकूण ७८४.९४६ एमएमक्युब (९६.९३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे जलविद्युत केंद्रांतील तीन पैकी दोन संचाव्दारे वीज निर्मिती सुरु करुन नदी पात्रात पाणी सोडले जात आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सर्तक रहावे, असे आवाहन करण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com