कडेगावमधून विश्वजित कदम बिनविरोध; भाजपची माघार

कडेगावमधून विश्वजित कदम बिनविरोध; भाजपची माघार
कडेगावमधून विश्वजित कदम बिनविरोध; भाजपची माघार

सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सोमवारी (ता. १४) माघार घेतली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अटी-शर्थीशिवाय माघार घेतल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीतील चुरस संपुष्ठात आली आहे. माजी मंत्री व कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होत आहे. कै. कदम यांचे चिरंजीव विश्‍वजित यांना कॉँग्रेसने उमेदवारी दिलीे. २८ मे रोजी मतदान होणार होते, मात्र आता अन्य चार जणांचे अर्जही मागे घेण्यात आले आहे. प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या विश्‍वजित यांच्यासाठी ही निवडणूक पुढील राजकीय वाटचालीचा महत्त्वाचा टप्पा असेल. प्रारंभी ही निवडणूक बिनविरोध होईल असेच वातारवण होते; मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनपेक्षितपणे संग्रामसिंह यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून ही निवडणूक चुरशीचे होईल असे संकेत दिले. अर्ज दाखल करण्यासाठी भाजपच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले होते.  भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ, शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे आणि विलासराव जगताप, देशमुख यांचे पक्षांतर्गत विरोधक अशी प्रतिमा निर्माण झालेले खासदार संजय पाटील अशी मात्तबर मंडळी संग्रामसिंह यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. संग्रामसिंह यांचे चुलत भाऊ व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचाही डमी अर्ज दाखल करण्यात आला होता. हा अर्ज छाननीत अवैध ठरला. कारण देशमुख यांनी उमेदवारी भाजपची असे अर्जात नमूद केले असले, तरी त्याला एबी फॉर्म मात्र जोडलेला नव्हता. त्यामुळे विश्‍वजित विरुद्ध संग्रामसिंह असा सामना निश्‍चित झाला होता. मात्र अचानकपणे संग्रामसिंह यांनी माघार घेत विश्‍वजित यांचा मार्ग सुकर केला आहे.  भाजपने उमेदवार उभा केल्यानंतरही या निवडणुकीत शिवसेनेने माघार घेत विश्‍वजित यांना पाठिंबा दिला होता. खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचा पाठिंबा देणारे पत्र प्रसिद्धीस दिले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com