agriculture news in marathi Vishwajit Mane acting Agriculture Commissioner | Agrowon

विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्त

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची बदली झाल्यानंतर नवे आयुक्त येण्यापूर्वीच त्यांनी आयुक्तालय सोडले. आता कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजित माने यांच्याकडे आयुक्तपदाची तात्पुरती सूत्रे देण्यात आली आहेत.

पुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची बदली झाल्यानंतर नवे आयुक्त येण्यापूर्वीच त्यांनी आयुक्तालय सोडले. आता कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजित माने यांच्याकडे आयुक्तपदाची तात्पुरती सूत्रे देण्यात आली आहेत.

कृषी आयुक्तालयात सोमवारी (ता.१३) नाट्यपूर्ण घडामोडी झाल्या. श्री. दिवसे यांनी पीएमआरडीच्या मुख्य कार्यकारी अधिकारिपदाची सूत्रे हाती घेतली. विशेष म्हणजे बदलीबाबत श्री. दिवसे यांनी स्वतःही आश्चर्य व्यक्त केले. नव्या आयुक्तांबाबत संभ्रमावस्था आहे. ‘‘श्री. दिवसे यांची बदली कोणालाही अपेक्षित नव्हती. खरीप हंगाम सुरू असल्यामुळे तसेच राज्याच्या कृषी क्षेत्रात सध्या घडामोडी होत असल्याने बदली झाली तरी ते लगेच पदभार सोडतील असे वाटत नव्हते. तसेच प्रभारी आयुक्त शेखर गायकवाड असतील, अशी देखील अटकळ होती. मात्र, सर्व घडामोडी अनपेक्षित आहेत,’’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

बदली झाली तरी कामकाजातील अडचणी समजावून घेत श्री. दिवसे यांच्याकडून महत्त्वाच्या मुद्यांबाबत सूचना केल्या जात होत्या. नवे आयुक्त येईपर्यंत कामकाजावर लक्ष ठेवण्याच्या सूचना श्री. दिवसे यांना मंत्रालयातून देण्यात आल्या होत्या. तथापि, त्यांनी सोमवारी तातडीने बदली झालेल्या नव्या कार्यालयाची सूत्रे स्विकारली. आयुक्तालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, श्री. दिवसे यांच्या बदलीमुळे कर्मचारी व अधिकारी नाराज आहेत. मनमिळाऊ व पारदर्शक कारभारामुळे राज्यात कृषी यंत्रणा पूर्वपदावर येत होती. मात्र, ऐन खरिपात बदली केल्यामुळे कामकाज विस्कळीत होणार आहे.

खूप काम करायचे होतेः दिवसे
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत श्री. दिवसे यांना निरोप देण्यात आला. ‘‘मला शेती आणि शेतकऱ्यांसाठी खूप काम करण्याची इच्छा होती. स्मार्टसारखे काही प्रकल्प साकारायचे होते. केंद्राचे नवे प्रक्रिया धोरण देखील राबवायचे होते. मात्र, बदली झाल्याने सर्व काही सोडून जावे लागत आहे,’’ असे ते म्हणाले. 


इतर अॅग्रो विशेष
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...
मुगावर काय फवारायचे?अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
दूध दर आंदोलनाचा राज्यभर एल्गारपुणे: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व...
पीकविमा नोंदणीत महाराष्ट्राची आघाडीपुणे: डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा...