दिव्यांग विठ्ठल मशरूम व्यवसायातून आत्मनिर्भर 

कात्नेश्‍वर (ता. पूर्णा) येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील विठ्ठल वामनराव चापके हा दिव्यांग तरुण दोन वर्षांपासून मशरूम विक्रीच्या व्यवसायात स्थिरावला आहे.
दिव्यांग विठ्ठल मशरूम व्यवसायातून आत्मनिर्भर 
दिव्यांग विठ्ठल मशरूम व्यवसायातून आत्मनिर्भर 

परभणी ः कात्नेश्‍वर (ता. पूर्णा) येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील विठ्ठल वामनराव चापके हा दिव्यांग तरुण दोन वर्षांपासून मशरूम विक्रीच्या व्यवसायात स्थिरावला आहे. थेट घरपोच विक्री केल्यामुळे अनेक परभणीकरांच्या आहारात मशरूमचा समावेश झाला आहे. तीन चाकी सायकलवर या व्यवसायाद्वारे आत्मनिर्भर झालेल्या विठ्ठलने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विठ्ठल चापके यांचे मूळ गाव कात्नेश्‍वर. तेथे चापके कुटुंबीयांची वडिलोपार्जित तीन एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. ती इतर शेतकऱ्यांना करार पद्धतीत दिली जाते. वामनरावांना चार मुले आणि एक मुलगी आहे. त्यात सध्या ३४ वर्षे वय असलेला विठ्ठल भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे. वडिलांचे छत्र लहाणपनीच हरवले. घरची आर्थिक बिकट असल्यामुळे जीवनातील इतर संघर्षामुळे विठ्ठल नवीन व्यवसायाच्या शोध घेत असताना मशरूम व्यवसायाबाबत माहिती मिळाली.  परभणी शहरात ग्राहकांकडून बटण मशरूमची मागणी असल्याने लातूर, औरंगाबाद, नागपूर, अकोला, अमरावती जिल्ह्यातून बटण मशरूम खरेदीस सुरुवात केली. सध्या औरंगाबाद किंवा नागपूर येथून एकदिवसआड १७५ ते २०० रुपये प्रतिकिलो दराने मशरूमची खरेदी केली जाते. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे मशरूम उत्पादन ते विपणन या विषयावरील प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले. पत्नी पार्वती यांच्या मदतीने घरी मशरूम तसेच मशरूमपासून बिस्कीट, पापड, घरगुती मसाले, खारोड्या आदी पदार्थ तयार करून विक्री केली. सध्या बटण मशरूमची २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होते. लॉकडाउनपूर्वी दररोज ५ ते ६ किलो मशरूम विकत असे. सध्या २ ते ३ किलोपर्यंत विक्री होत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर विक्रीचा स्टॉल लावला जातो. शहरातील विविध वसाहतीमध्ये घरपोच विक्री केली जाते. ‘आत्मा’तर्फे इतर शेतकरी गटांसोबत विठ्ठल यांना देखील संत सावता माळी आठवडे बाजारात मशरूम विक्रीसाठी मुभा देण्यात आली. मशरूम विक्रीतून खर्च जाता २०० ते ३०० रुपये उरतात. याद्वारे पायाने दिव्यांग परंतु मनाने मात्र खंबीर असलेल्या विठ्ठल यांनी आपल्या व्यवसायात जम बसविला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com