agriculture news in marathi Vitthal-Rukhmini temple, Swami Samartha Temple to remain close | Agrowon

विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर, स्वामी समर्थ मंदिर बंद

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 मार्च 2020

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक धार्मिक स्थळे ३१ मार्चपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचे संबंधित देवस्थानांच्या प्रमुखांनी मान्य केल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यात सोलापूरसह राज्यात महत्त्वाच्या समजले जाणारे पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर व सोलापूर येथील सिद्धेश्‍वर मंदिराचाही समावेश आहे. 

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक धार्मिक स्थळे ३१ मार्चपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचे संबंधित देवस्थानांच्या प्रमुखांनी मान्य केल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यात सोलापूरसह राज्यात महत्त्वाच्या समजले जाणारे पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर व सोलापूर येथील सिद्धेश्‍वर मंदिराचाही समावेश आहे. 

कोरोना विषाणूंच्या संसर्गला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिल्ह्यातील देवस्थानच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्या वेळी सर्व सार्वजनिक धार्मिक स्थळे आणि देवस्थान प्रमुखांनी दर्शन ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे मान्य केले. धार्मिक स्थळातील विधी आणि नित्योपचार सुरू राहतील. पण हे करतानाही आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी धार्मिक स्थळांच्या प्रमुखांना केले. या वेळी विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समिती पंढरपूर, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर, अक्कलकोट, मारुती मंदिर गौडगाव, दर्गाह, हैद्रा, सिद्धेश्‍वर मंदिर देवस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

लोकांनी गर्दी करू नये. लग्न, कौटुंबिक समारंभात गर्दी करू नये. शक्‍य असल्यास लग्न समारंभ लांबणीवर टाकण्याचे आवाहनही त्यांनी केले. बाजार समितीतील व्यवहार तीन सत्रांत करण्याच्या सूचनाही बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


इतर अॅग्रो विशेष
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...